For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | माळशिरस पंचायत समितीत भ्रष्टाचार उघडकीस; वरिष्ठ सहाय्यक लाचखोरी करत रंगेहाथ पकडला

03:50 PM Feb 24, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   माळशिरस पंचायत समितीत भ्रष्टाचार उघडकीस  वरिष्ठ सहाय्यक लाचखोरी करत रंगेहाथ पकडला
Advertisement

                             सभामंडपाचे कंम्पीशन सर्टिफिकेटसाठी लाचखोरी

Advertisement

सोलापूर -सभामंडपाच्या कामाचे कंम्पीशन सर्टिफिकेट देण्याकरीता 5 हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी सोमवारी वरिष्ठ सहाय्यकास एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलंय. ही घटना माळशिरस पंचायत समितीत घडलीय. सुंदरराव उत्तम नागटिळक (वय- 56 वर्षे) असं आरोपीत लोकसेवकाचं नांव आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी केलेल्या सभामंडपाच्या कामाचे कंम्पीशन सर्टिफिकेट देण्याकरीता माळशिरस पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक नागटिळक यांनी तक्रारदाराकडं 10 हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी केली होती. लाच रक्कमेत तडजोड होऊन 05 हजार रूपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराची तक्रार आल्यावर सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी करून सोमवारी सापळा रचला होता.

Advertisement

कामाचे कंम्पीशन सर्टिफिकेट देण्याकरीता 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना सुंदरराव नागटिळक (राह. टाकळी रोड, पंढरपूर) या लोकसेवकास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी माळशिरस पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

Advertisement
Tags :

.