पदवी प्रमाणपत्रावरील मराठी नावात अचूक दुरूस्ती करा
04:43 PM Dec 08, 2024 IST | Radhika Patil
Advertisement
कोल्हापूर :
Advertisement
शिवाजी विद्यापीठाचा 61 वा वार्षिक दीक्षांत समारंभ जानेवारी 2025 मध्ये नियोजित आहे. यावर्षीच्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात येणाऱ्या पदवीप्रमाणपत्रावर मराठी व इंग्रजी मजकुर छापण्यात येणार आहे. त्यामुळे पदवीप्रमाणपत्रावर मराठीतील (देवनागरी) नाव अचुक यावे आणि या नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यापीठामार्फत मराठी नावांची पडताळणी करण्यासाठी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर लॉगइनमध्ये नावाचा तपशिल 13 डिसेंबरपर्यंत उपलब्ध करुन दिला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत पदवीप्रमाणपत्रावरील मराठीतील नावाचा तपशिल अचूक असल्याची खात्री करावी. तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन शिवाजी विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement