For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेना नगरसेवक रोहन खेडेकर यांचा भाजपात प्रवेश

04:41 PM Mar 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शिवसेना नगरसेवक रोहन खेडेकर यांचा भाजपात प्रवेश
Advertisement

देवगड/ प्रतिनिधी
देवगड- जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नितेश राणे यांच्या मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.नगरसेवक रोहन खेडेकर हे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 7 मधून निवडून आले होते. त्यावेळी ते उबाठा शिवसेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बुधवारी त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे नेतृत्व स्वीकारत भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी भाजपाचे नेते बाळ खडपे, नगरसेवक बुवा तारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाचे देवगड- जामसंडे नगरपंचायतीमधील पक्षीय बळ वाढले आहे. भाजपाचे सभागृहातील नगरसेवकांची संख्या आता १२ झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.