For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मान्सूनला प्रभावित करत आहेत कोरोनल होल्स

07:00 AM Feb 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
मान्सूनला प्रभावित करत आहेत कोरोनल होल्स
Advertisement

एका नव्या अध्ययनात वैज्ञानिकांनी सूर्याच्या आत निर्माण झालेल्या छिद्रांमुळे भारतात मान्सूनवर मोठा प्रभाव पडत असल्याचा शोध लावला आहे. या छिद्राना कोरोनल होल्स म्हटले जाते. वैज्ञानिकांनी सूर्याच्या कोरोनल होल्सच्या आत तापमान अन् चुंबकीय क्षेत्र संरचनांच्या भौतिक मापदंडांचा अचूक अनुमान लावला आहे. यामुळे त्यांना पृथ्वी समवेत अंतराळाचे हवामान आणि भारतात ग्रीष्मकालीन मान्सून पावसावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असल्याचे कळले आहे. हा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अंतराळाचे हवामान उपग्रहांना प्रभावित करते. या निष्कर्षासोबत आणखी एका गोष्टीचा पुरावा मिळाला आहे की सूर्याच्या कोरोनल होल्सचा भारतीय मान्सूनवरही प्रभाव पडतो. भारतीय खगोलशास्त्र संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञांनी आता या कोरोनल छिद्रांच्या आतील तापमान आणि चुंबकीय क्षेत्राच्या शक्तीच्या अक्षांशावर निर्भरतेचा अचूकपणे शोध लावला आहे.

Advertisement

कोरोनल छिद्र म्हणजे काय?

1970 च्या दशकात पहिल्यांदा कोरोनल छिद्र शोधण्यात आले होते, हे कमी घनत्व असलेले क्षेत्र असून यात खुल्या चुंबकीय क्षेत्राची संरचना असते, जी दुसऱ्या ग्रहांपर्यंत फैलावलेली असते. हे कोरोनल छिद्र सूर्याच्या वेगवान वाऱ्यामुळे तयार होतात. सूर्यावरील वारे, आवेशित कणांचे प्रवाह असून जे सूर्याच्या वेगाने बाहेर पडतात, हे वेगवान वारे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात येऊ शकतात, यामुळे भू-चुंबकीय वादळ आणि पृथ्वीच्या आयनमंडळात गडबड निर्माण होऊ शकते. यामुळे रेडिओ तरंगांचा संचार बाधित होऊ शकतो. एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स नावाच्या नियतकालिकात प्रकाशित या अध्ययनात कोरोनल छिद्रांच्या अध्ययनासाठी सोलर अँड हीलियोस्फेरिक ऑब्जर्वेटरी अंतराळ यानातून प्राप्त फूल-डिस्क कॅलिब्रेटेड छायाचित्रांचा वापर करण्यात आला.

Advertisement

संशोधकांनी सूर्याच्या छिद्रांचा शोध लावला आणि चुंबकीय संरचनांच्या भौतिक मापदंडांचा अचूक अनुमान लावला आहे. अध्ययनाचे मुख्य लेखक आयआयएचे डॉ. मंजूनाथ हेगडे यांनी संशोधनाच्या दोन प्रमुख निष्कर्षांविषयी सांगितले आहे. विविध अक्षांशावर कोरोनल छिद्रांच्या तापमान संरचनात कुठलाच महत्त्वपूर्ण नाही. तसेच कोरोनल छिद्रांच्या आत चुंबकीय क्षेत्र संरचनेची शक्ती अक्षांशासोबत बदलत राहते, जी सौर भूमध्य रेषेपासून ध्रुवापर्यंत वाढत राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निष्कर्षांमधून कोरोनल छिद्र संभाव्यपणे सूर्याच्या आतील भागातून निर्माण होतात आणि हे अल्फवेन तरंग गडबडयुक्त सुपरपोझिशनने निर्माण होऊ शकतात, असे कळले आहे.

Advertisement
Tags :

.