कोरोना घोटाळा याचिका निकाली
कोल्हापूर :
जिल्हा परिषदेत कोरोना काळात औषध व साहित्य खरेदीतील कथित घोटाळ्याची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. याचा निर्णय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला आहे. याचा पोलीस अहवाल मिळाल्यानंतर पुन्हा दाद मागण्याचा अधिकार याचिकाकर्त्यांना असल्याचेही न्यायालयाने नमुद केले आहे.
कोरोना घोटाळ्यासंदर्भात गतवर्षी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मागील काही महिन्यांसून यांची सुनावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून उच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यातील ऑनलाईन सुनावनीवेळी तपासासंदर्भात माहिती घेतली होती. याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. शाहूपुरी पोलिसांकडून याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या जुन्या कागलकर वाड्यातून तपासाला सुरूवात केली.
कोरोना काळात झालेली औषध खरेदी, बिलाची रक्कम आदा करण्याची प्रक्रिया, खरेदीचे तेंव्हांचे दर, खरेदीसाठी काढलेली निविदा प्रक्रिया, खरेदी केलेल्या वस्तूंची पारदर्शकता आदी बाबींची छाननी करण्यात आली. याचा अहवाल बंद लिफाफ्यातून न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र, याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा अहवाल पंडित यांनी दिला असल्याचे निकाल पत्रात नमुद करण्यात आले आहे.