महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोअर सेक्टरची वाढ 3 महिन्यांमधील सर्वाधिक

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

महत्वपूर्ण उद्योगक्षेत्रांनी फेब्रुवारी महिन्यात तीन महिन्यांमधील सर्वाधिक वाढ नोंद केली आहे. अशी आठ क्षेत्रे आहेत. त्यांची उलाढाल एकंदर औद्योगिक उलाढालीच्या 40 टक्के इतकी असल्याने ही क्षेत्रे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची मानली जातात. त्यांची वाढ सातत्यपूर्ण राहिली तर देशाची अर्थव्यवस्था नजीकच्या भविष्यकाळात सध्यापेक्षाही अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात या क्षेत्रांची सरासरी वाढ 6.7 टक्के इतकी होती. दगडी कोळसा, इंधन तेल, पोलाद, सिमेंट, वीज, खते, शुद्धीकृत उत्पादने आणि नैसर्गिक वायू अशी ही आठ उद्योग क्षेत्रे आहेत. 2023 च्या फेबुवारी महिन्यात या क्षेत्रांच्या वाढीचा वेग 7.4 टक्के इतका, म्हणजे यंदाच्या फेब्रुवारीपेक्षा जास्त होता.

Advertisement

सात क्षेत्रांची वाढ समाधानकारक

फेब्रुवारीत सर्वाधिक वाढ कोळसा उत्पादन क्षेत्रात झाली असून ती 11.6 टक्के होती. तर इंधन तेल क्षेत्राची वाढ 7.9 टक्के या दराने झाली. इतर पाच क्षेत्रांची वाढही फेब्रुवारीत 5.67 टक्के ते 8.89 टक्के अशा वेगाने झाली आहे. केवळ खत क्षेत्राचे मात्र आकुंचन झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

औद्योगिक वाढ 5 महिन्यांमधील सर्वाधिक

फेब्रुवारी 2024 या महिन्यात एकंदर औद्योगिक उत्पादनात गेल्या पाच महिन्यांमधील सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. मागणीमध्ये झालेली मोठी वाढ आणि कमी निर्मितीखर्च यामुळे ही पाच महिन्यांमधील सर्वाधिक पातळी गाठली गेली आहे, अशी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पीएमआयमध्येही उत्साहवर्धक वाढ

एचएसबीसी इंडिया मॅन्यूफॅक्चरिंग पर्चेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) अनुसार भारताचा पीएमआय इंडेक्स फेब्रुवारीत 56.9 टक्के इतका आहे. जानेवारीत तो 56.5 टक्के इतका होता. तर डिसेंबरमध्ये तो 54.9 इतका कमी होता. पण आता त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. हा निर्देशांक औद्योगिक प्रगतीचा मापदंड मानला जातो. त्यामुळे ही आकडेवारी महत्वाची आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article