For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्नड भाषा संवर्धन कायद्याच्या प्रती फाडल्या

12:42 PM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
कन्नड भाषा संवर्धन कायद्याच्या प्रती फाडल्या
Advertisement

मराठी भाषिकांकडून निषेध : मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या भाषेला आरक्षणाची गरज काय?

Advertisement

बेळगाव : कन्नड भाषा संवर्धन कायदा 2022 मुळे मराठीसह इतर सर्वच भाषिक अल्पसंख्याकांना भाषिक अधिकारापासून दूर राहावे लागणार आहे. इतकेच नाही तर कन्नडमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणासह नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा हा असंविधानिक कायदा असल्याचे सांगून म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी  याचा निषेध व्यक्त करीत त्याच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयातच फाडल्या. या कायद्यामुळे पहिली ते दहावी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासह नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळणार आहे. इंजिनिअरिंग तसेच इतर तांत्रिक अभ्यासक्रमांसह आयटी क्षेत्रासाठीही आरक्षण दिले जाणार आहे. तसेच कंपन्यांमध्ये बिलिंगसह इतर सर्व व्यवहार कन्नडमध्ये झाल्यास उद्योजकांना व्यावसायिक करात सूट देण्याचे या कायद्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे इतर भाषिक विद्यार्थी, उद्योजक यांचे भविष्यात मोठे नुकसान होणार आहे. ज्या भाषा दुर्मीळ होत आहेत, त्यांना आरक्षण योग्य आहे. परंतु मोठ्या संख्येने बोलल्या जाणाऱ्या भाषेला आरक्षणाची गरज काय, असे म्हणत या कायद्याच्या प्रती कार्यकर्त्यांनी फाडल्या.

नगरसेवकांचा मराठी बाणा

Advertisement

मराठीच्या हक्कासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी नगरसेवकांनी आपला बाणा दाखविला. नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर व वैशाली भातकांडे यांनी निवेदन देण्यासाठी हजेरी लावली होती. हातामध्ये मराठीचे फलक घेऊन त्यांनी मराठी भाषिकांना बळ दिले. महापालिकेमध्ये मराठीसाठी झगडणाऱ्या नगरसेवकांनी रस्त्यावरच्या लढाईमध्येही आपला सहभाग दर्शविला. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अ‍ॅड. एम. जी. पाटील, रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, रमाकांत कोंडुस्कर, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, आर. एम. चौगुले, अ‍ॅड. महेश बिर्जे, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, माजी आमदार दिगंबर पाटील, मदन बामणे, आबासाहेब दळवी, माजी महापौर सरिता पाटील, उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते शुभम शेळके, प्रकाश अष्टेकर, सुनील बाळेकुंद्री, आर. आय. पाटील, राजकुमार बोकडे, रामचंद्र मोदगेकर, वासू सामजी, श्रीकांत कदम, रंजित हावळाण्णाचे, दुद्दाप्पा बागेवाडी, वामन पाटील, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, दयानंद उघाडे, एम. आर. पाटील, धाकलू करविनकोप्प यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.