महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुन्हेगारीविरोधात तीन राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांची समन्वय बैठक

11:38 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेकायदा दारू वाहतूक, अमलीपदार्थ, गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत तिन्ही राज्यांतील पोलिसांनी समन्वय वाढविण्याचे ठरविण्यात आले. सीमाभागातील गुन्हेगारी कारवाया व गुन्हेगारांविषयी माहितीची देवाण-घेवाण करण्यात आली. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश यांच्या पुढाकारातून पोलीस मुख्यालयात तीन राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत गोव्याचे आयजीपी ओमवीरसिंग बिश्नोई, कोल्हापूरचे आयजीपी सुनील फुलारे, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनँग आदींसह तिन्ही राज्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह गोवा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, विजापूर आदी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतला होता. कोल्हापूर, सांगली व सोलापूरच्या पोलीसप्रमुखांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत सहभाग दर्शविला. यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बनँग यांच्याशी संपर्क साधला असता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तिन्ही राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासकरून सीमाभागातील गुन्हेगार व गुन्हेगारी कारवायांविषयी बरीच चर्चा करून माहितीची देवाण-घेवाण केली आहे, असे त्यांनी सांगितले. बेकायदा दारू, अमलीपदार्थांची तस्करी टाळण्यासाठी समन्वय वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article