महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांची समन्वय बैठक

10:41 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीमेवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न : अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चोऱ्या, घरफोड्या आदी गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्याबरोबरच निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांमध्ये साधल्या जाणाऱ्या समन्वयाबद्दल चर्चा करण्यात आली. देसूर येथील गोल्फ क्लबजवळील वन खात्याच्या गेस्ट हाऊसमध्ये ही बैठक झाली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गडहिंग्लजचे पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, वाहतूक विभागाचे एसीपी पवन एन., चंदगडचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. शनिवार दि. 30 मार्च रोजी ही बैठक झाली. या बैठकीत सीमेवरील गुन्हेगारी प्रकरणांचा दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर दोन्ही राज्याच्या पोलिसांनी काटेकोरपणे तपासणी करण्याचेही ठरविण्यात आले. खासकरून आंतरराज्य बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी सतर्कता बाळगण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. गुन्हेगारी प्रकरणांच्या खासकरून चोऱ्या, घरफोड्या आदी प्रकरणांच्या तपासकामात एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. दोन्ही राज्यातील गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण करण्याबरोबरच गुन्हे थोपविण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी मांडली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article