For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीएसएस कॉलेज-गडहिंग्लज इन्स्टिट्यूटमध्ये समन्वय करार

10:49 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
जीएसएस कॉलेज गडहिंग्लज इन्स्टिट्यूटमध्ये समन्वय करार
Advertisement

एसकेई सोसायटीचे व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू यांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : जीएसएस कॉलेजच्या रसायनशास्त्र व गडहिंग्लज येथील फार्मास्युटिकल व अॅनालिटीकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यात समन्वय करार करण्यात आला. एसकेई सोसायटीचे व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू यांच्या उपस्थितीत हा करार झाला. संस्थेचे संस्थापक रूपेश पाटील यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान झाले. ज्ञान, कौशल्य आणि सदाचार ही त्रिसूत्री अंगी बिंबविण्याचे आवाहन त्यांनी केले. फार्मा कंपनीमध्ये संशोधन आणि विकास, गुणवत्ता, औषध विकास अशा विविध क्षेत्रात असलेल्या संधींबाबत त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये लागणारे मनुष्यबळ व त्यासाठी लागणारी तंत्रे शिकून घेण्याचे आवाहन केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एन. देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. विनया पित्रे यांनी परिचय करून दिला. प्रा. चारुशिला बाळीकाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रंजित पंडित यांनी आभार मानले. प्रा. भरत तोपिनकट्टी, प्रा. अभय सामंत व विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.