सहकार आयुक्तांचा गुणरत्न सदावर्तेंना दणका ! सदावर्तेंच्या मेव्हण्याची बँकेच्या संचालकपदावरून हकालपट्टी
गेल्या वर्षभरातून चर्चेत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी जनसंघ या संघटनेला धक्का बसला असून संघटनेचे गुणरत्न सदावर्ते यांचे मेव्हणे आणि एसटी कर्मचारी बँकेचे व्यवस्थापकिय संचालक सौरभ पाटील यांची बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी केली आहे.
सहकार आयुक्तांनी एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का दिला आहे. एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पदावर विराजमान असलेले एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांची पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे तसेच आरबीआयची पूर्व परवानगी न घेता पदावर बसल्याने त्यांची व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी केली आहे.
या सर्व घडामोडीत आता सदावर्ते यांच्या एस कामगार जनसंघ या संघटनेतील एसटी कर्मचारी सदस्य देखील त्यांना दुसरा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून राज्यातील सर्वात मोठी एसटी कर्मचारी संघटना असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या कष्टकरी एसटी कामगार जनसंघ संघटनेतून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली राष्ट्रीय कर्मचारी सेना युनियनमध्ये सामील होणार असल्याचे जाहीर केले आहे. या संबंधीच्या घडामोडींची माहीती संघटनेचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिली आहे