For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शंभर टक्के मतदानासाठी सहकार्य करा

11:01 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
शंभर टक्के मतदानासाठी सहकार्य करा
Advertisement

जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांचे आवाहन : स्वीप समितीतर्फे शहरात जनजागृती मोहीम

Advertisement

बेळगाव : जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून शहरामध्ये मतदान जागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते हिरवे निशाण दाखवून रॅलीला चालना देण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सर्व मतदारांना सक्तीने मतदान करण्याचे आवाहन केले. यंदा मतदानाचा टक्का 100 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी रॅलीच्या माध्यमातून केले. जि. पं. सीईओ राहुल शिंदे म्हणाले, जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मतदान जागृती केली जात आहे. यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाचाच भाग म्हणून शहरामध्ये पदयात्रा काढून मतदान जागृती केली जात आहे. सर्व मतदारांनी लोकसभा निवडणुकीत सक्तीने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या मतदान जागृती रॅलीला चन्नम्मा चौकातून सुरुवात करण्यात आली. काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, ध. संभाजी चौक मार्गे रॅली काढण्यात आली. यावेळी मतदानाचे महत्त्व पटवून देणारे फलक दाखविण्यात आले. दरम्यान कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून यक्षगाण कलापथकातर्फे   भाग घेऊन जागृती करण्यात आली. नृत्य, ढोल आदी कलापथकांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. महानगरपालिकेचे कर्मचारी, युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याचे विद्यार्थी, बेसीएम वसतिगृह विद्यार्थी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत अधिकारी यांच्यासह शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी विविध जागृती फलक घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, गुन्हे आणि वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, जिल्हा पंचायतीचे योजना अधिकारी डॉ. एम. कृष्णराजू, उपकार्यदर्शी बसवराज अडवीमठ, लेखाधिकारी गंगा हिरेमठ, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश, युवा सबलीकरण व क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.