For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

VIP Darshan Ban | 'या' कारणावरुन पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून गोंधळ!; जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

03:40 PM Jul 16, 2026 IST | NEETA POTDAR
vip darshan ban    या  कारणावरुन पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून गोंधळ   जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा
Advertisement

पंढरपुर - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावे,यासाठी प्रशासन पुर्णपणे सज्ज झाले आहे.. नुकताच 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.मात्र, या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात झाले्ल्या गोंधळाने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत..

Advertisement

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना व्हीआयपी दर्शन बंदीचा फटका बसला. दुसरीकडे, शिवसेनेच्या एका मंत्र्यांनी आपल्या मोठ्या ताफ्यासह दर्शन घेतल्याचं समोर आल्यानंतर प्रशासनाच्या निर्णयावर टीका होऊ लागली.

या संपूर्ण प्रकाराची दखल आता प्रशासनाने घेतली आहे. व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली नियम मोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला आहे. अगदी आपत्कालीन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं...

Advertisement

ते पुढे हे ही म्हणाले.. राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदार यांना प्रोटोकॉलनुसार दर्शनाची सुविधा मिळणार असली, तरी त्यांच्यासोबत येणाऱ्या मोठ्या ताफ्याला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित लोकप्रतिनिधीसोबत केवळ दोन ते तीन व्यक्तींनाच दर्शनाची परवानगी असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.पंढरपुरात जिल्हाधिकारी स्वतः मंदिर परिसर आणि व्यवस्थेची पाहणी करत होते, या पाहणी दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते..

Advertisement
Tags :

.