For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा मासळी मार्केटमध्ये मासळी विकण्यावरून वाद

05:57 PM Jan 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आचरा मासळी मार्केटमध्ये मासळी विकण्यावरून वाद
Advertisement

तोंडवळी गावातील मासळी विक्रेत्यां महिलांचे आचरा सरपंचांना निवेदन

Advertisement

आचरा प्रतिनिधी

आचरा मासळीमार्केट तोंडवळी येथील मच्छि विक्रेत्या महिला मच्छीविक्रीसाठी मासळी मार्केटमध्ये आल्यानंतर रविवारी आचरे गावातील काही मच्छी विक्रेत्या महिला व तळाशील-तोंडवळी मधील मच्छी विक्रेत्या महिलां यांच्यात मासळी मार्केटमध्ये बसून मच्छी विक्री करण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतर तोंडवळी तळाशील येथील मासळी विक्रेत्या महिलांनी आचरा सरपंच जेरॉन फार्नांडिस व उपसरपंच संतोष मिराशी यांची आचरा ग्रामपंचायतमध्ये भेट घेत तळाशील येथील मच्छी विक्रेत्या महिलांना आचरा येथे मच्छी मार्केटमध्ये मासळी विक्रीस परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन देत मागणी केली आहे.

Advertisement

निवेदन सादर करताना तोंडवळी तळाशील येथील पूजा शेलटकर, गया तारी, स्वप्नाली केळुसकर, दीपिका केळुसकर, सलोनी खवणेकर, अर्चना चोडणेकर, तारामतीस मायबा, नीता कोचरेकर, नली रेवंडकर, संजना रेवंडकर व माजी सरपंच मंगेश टेमकर आदीजण उपस्थित होते.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मागील कित्येक वर्षांपासून तळाशील तोंडवळी येथील मच्छीविक्रेत्या महिला आचरा येथे बाजाराच्या दिवशी व इतर दिवस मासे विक्री व्यवसाय करत आहेत परंतु अलीकडे आचरे गावातील काही मच्छीविक्रेत्या महिला तळाशील-तोंडवळी मधील मच्छी विक्रेत्या महिलांना आचरा येथील मच्छीमार्केटमध्ये बसून मच्छी विक्री करण्यास विरोध करीत आहेत. 14 रोजी तळाशील मधील काही मच्छी विक्रेत्या महिला मच्छी विक्री करण्यासाठी गेल्या असता त्यांना विरोध दर्शवून यापुढे मच्छीविक्री करण्यास आलात तर मच्छी वर फिनेल ओतून उसकावून लावण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. सदर धमकी गंभीर असून तळाशील-तोंडवळी येथील मच्छी विक्रेत्याना मच्छीमार्केटमध्ये बसण्यास परवानगी देऊन आपण न्याय मिळवून द्यावा असे म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.