महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिझोरममध्ये विमानतळावरून वाद

06:45 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वायुदलाला विमानतळ सोपविण्यास राजकीय पक्षांचा विरोध

Advertisement

वृत्तसंस्था/ आयझोल

Advertisement

मिझोरममधील लेंगपुई विमानतळ भारतीय वायुदलाला सोपविण्याच्या योजनेला विरोध आहे. मिझोरममधील मुख्य विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटचे (एमएनएफ) अध्यक्ष जोरमथांगा यांनी राज्यातील एकमात्र विमानतळ लेंगपुई वायुदलाला सोपविण्याच्या योजनेला विरोध असल्याचे म्हटले आहे. लेंगपुई विमानतळ राज्याचे अस्तित्व आणि अन्य क्षेत्रांसोबत संपर्काचा स्रोत राहिला आहे. सरकार लेंगपुई विमानतळ भारतीय वायुदल किंवा अन्य यंत्रणांना सोपविण्याचा विचार करत असेल तर एमएनएम अखेरपर्यंत विरोध करणार आहे. विमानतळ कुठल्याही स्थितीत इतरांना दिले जाऊ शकत नसल्याचे जोरमथांगा यांनी म्हटले आहे.

अद्याप निर्णय नाही

वाढत्या विरोधामुळे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी राज्य सरकारने लेंगपुई विमानतळ वायुदलाला सोपविण्याबद्दल अद्याप निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. विमानतळ भारतीय वायुदल किंवा खासगी संस्थांना सोपविण्याच्या व्यवहार्यतेचे अध्ययन केले जात आहे. या कामासाठी स्थापन कार्य समिती सध्या विषयाचे आकलन करत असून याचा अहवाल आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सादर केला जाणार असल्याचे लालदुहोमा यांनी सांगितले आहे.

रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण

लेंगपुई विमानतळ हा मिझोरममधील एकमात्र विमानतळ आहे. तसेच राज्य सरकारकडे मालकी असलेला हा देशातील एकमात्र विमानतळ आहे. काही वर्षांपूवीं वायुदलाने हा विमानतळ सोपविण्यात यावी अशी मागणी केली होती. वायुदलाच्या प्रस्तावानुसार विमानतळाचे पूर्ण संचालन वायुदलाकडून केले जाणार आहे. तर राज्य सरकार देखील विमानतळात स्वत:ची टर्मिनल इमारत आणि अन्य सुविधांचा वापर जारी ठेवू शकते. हा विमानतळ अत्यंत रणनीतिक महत्त्वाचा आहे आणि बांगलादेश तसेच म्यानमारच्या सीमेदरम्यान स्थित आहे. मिझोरममध्ये सुरक्षा रडार सिस्टीम तैनात करण्याचा विचार वायुदलाकडून सुरू  आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article