महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

50 वर्षांपासूनच वाद समाप्त

06:48 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॉरिशसला ‘चागोस’ परत करणार ब्रिटन : हिंदी महासागरातील महत्त्वाचे ठिकाण

Advertisement

 वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

ब्रिटन आणि मॉरिशस यांच्यात अखेर चागोस बेटसमुहावरून करार झाला आहे. ब्रिटन हिंदी महासागरात स्थित सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चागोस बेटसमुहाला मॉरिशसला सोपविण्यास सहमत झाला आहे. या बेटावरून दोन्ही देशांदरम्यान 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वाद सुरू होता. भारताने या वादाप्रकरणी उघडपणे मॉरिशसला साथ दिली होती.

कराराच्या अंतर्गत आम्ही चागोस बेटसमुहाचे सार्वभौमत्व मॉरिशसला सोपविणार आहोत. या करारानंतर दशकांपूर्वी बेटावरून विस्थापित झालेल्या लोकांना घरी परतण्याची मंजुरी मिळार असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. तर दिएगो गार्सिया येथील युके-अमेरिकन सैन्यतळाचा वापर ब्रिटन करत राहणार आहे. ब्रिटन अमेरिकेसोबत मिळून चागोसच्या दिएगो  गार्सिया बेटावर सैन्यतळाचे संचालन करतो, यामुळे दोन्ही देशांना हिंदी महासागरात रणनीतिक आघाडी प्राप्त होते.

वादाचे स्वरुप

1960-70 च्या दशकात ब्रिटनने चागोस बेटसमुहावर वास्तव्य करणाऱ्या लोकांना तेथून हाकलले होते. या घटनेला मानवतेच्या विरोधातील गुन्ह्याच्या स्वरुपात पाहिले जाते. 1968 मध्ये मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाल्यावरही ब्रिटनने या क्षेत्रावरील कब्जा कायम ठेवला होता. या क्षेत्रावर 1814 पासून ब्रिटनचे नियंत्रण राहिले आहे. ब्रिटनने मॉरिशस आणि सेशेल्सच्या सुमारे 2 हजार रहिवाशांना तेथून हटविले होते आणि अमेरिकेला येथे सैन्यतळ निर्माण करण्यासाठी आमंत्रित केले होते. 2019-21 दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाने देखील मॉरिशसच्या बाजूने निर्णय दिला होता. ब्रिटनने 1968 मध्ये स्वातंत्र्य देण्यापूर्वी चागोस बेटसमुहाला मॉरिशपासून बेकायदेशीरपणे वेगळे केल्याची टिप्पणी न्यायालयाने केली होती.

चागोस बेटसमुहाचे महत्त्व

चागोस हा सुमारे 60 बेटांचा एक समूह असून तो हिंदी महासागराच्या मधोमध स्थित आहे. हा बेटसमूह 60 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात फैलावलेला आहे. हा बेटसमूह मॉरिशसपासून सुमारे 2,200 किलोमीटर आणि भारतीय उपखंडापासून 1000 सागरी मैल अंतरावर आहे. चागोसची भौगोलिक स्थिती कुठल्याही देशाला हिंदी महासागरात सामरिकदृष्ट्या वरचढ स्थिती प्रदान करते. याचमुळे ब्रिटन आणि अमेरिका येथील सैन्यतळ कायम राखू इच्छित असल्याचे मानले जहत आहे.

ब्रिटनची भूमिका

संबंधित करारावरून ब्रिटनचे विदेशमंत्री डेव्हिड लॅमी यांनी वक्तव्य जारी केले आहे. ब्रिटनने दिएगो गार्सियावरील महत्त्वपूर्ण सैन्यतळाला सुरक्षित करत मॉरिशससोबत कार केला आहे. या कराराला अमेरिकेच देखील समर्थन मिळाले आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेला बळ मिळणार आहे. हा करार अवैध स्थलांतराचे मार्ग बंद करणार असून हिंदी महासागरातील धोके टाळणार असल्याचा दावा लॅमी यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article