महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

टीव्हीवर पाकिस्तानला उद्देशून वंशद्वेषी शब्द झळकल्याने वाद

06:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /कॅनबेरा

Advertisement

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टर इलेव्हनविऊद्धच्या सराव सामन्यादरम्यान ‘फॉक्स क्रिकेट’च्या ‘लाइव्ह स्कोअर टिकर’वर पाकिस्तान संघाला उद्देशून वंशद्वेषी ‘पाकी’ हा शब्द वापरण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मनुका ओव्हल येथे चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने टीव्हीवर झळकलेल्या सदर शब्दाचे छायाचित्र ‘एक्स’वर पोस्ट केले. नंतर ही चूक सुधारण्यात आली आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने या चुकीबद्दल माफी मागितली. ‘पाकी’ हा पाकिस्तान किंवा दक्षिण आशियातील वंशाच्या किंवा तेथे जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी वापरला जाणारा तिरस्कारयुक्त शब्द आहे. पत्रकार दानी सईद यांच्या वरील पोस्टने या चुकीकडे लक्ष वेधले. त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने या चुकीबद्दल माफी मागितली आहे. ‘सदर ग्राफिक हे एका डाटा पुरवठादाराचे स्वयंचलित ‘फीड’ होते, जे यापूर्वी पाकिस्तानच्या सामन्यासाठी वापरले गेलेले नाही. हे खेदजनक होते आणि ही चूक समोर येताच आम्ही दुऊस्त केली आहे’, असे स्पष्टीकरण ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने दिल्याचे सईदने ‘एक्स’वर नमूद केले

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article