For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅम पित्रोदा यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

06:15 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
सॅम पित्रोदा यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Advertisement

निवडणूक ऐन भरात आली असताना वादग्रस्त विधाने करुन आपल्याच पक्षाची कोंडी करु नये, याचे भान अनेक नेत्यांना रहात नाही, असे आजवर अनेकदा दिसून आले आहे. सध्या काँग्रेसचे विदेशस्थ नेते आणि राहुल गांधींचे सल्लागार मानले जाणारे सॅम पित्रोदा यांनी स्वपक्षालाच अडचणीत आणणारी वादग्रस्त विधाने करण्यात आघाडी घेतली आहे. अमेरिकेप्रमाणे भारतात ‘वारसा कर“ लागू करावा, असे विधान काही दिवसांपूर्वी करुन त्यांनी मोठा वाद निर्माण केला होता.

Advertisement

आता त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांसारखे दिसतात आणि दक्षिण भारतीय लोक आफ्रिकेतल्या लोकांसारखे दिसतात, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. ते त्यांनी का केले किंवा त्यांना असे बोलून त्यांना काय साध्य करायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तथापि, त्यांच्या या विधानामुळे भारतीय जनता पक्षाच्या हाती नवे कोलित लागले आहे.

काँग्रेसकडून सारवासारवी

Advertisement

आता पित्रोदा यांच्या या नव्या विधानावर पुन्हा काँग्रेसला सारवासारवी करावी लागली आहे. पित्रोदा यांचे हे वैयक्तिक विधान आहे. याचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. तसेच ही काँग्रेसची भूमिका नाही. भारतातील वैविध्याची तुलना पित्रोदा यांनी अन्य देशांमधील लोकांशी केली ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अशी विधाने काँग्रेसला कधीही मान्य होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी व्यक्त पेलेली असली तरी वादळ शमलेले नाही.

तीव्र प्रतिक्रिया

पित्रोदा अमेरिकेत राहतात. त्यांना भारत माहीती नाही. त्यांनी भारतीयांचा रंग, रुप, वर्ण यांवर टिप्पणी करुन स्वत:च्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नये, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मिडियावर आल्या आहेत. असंख्य नेटकऱ्यांनी पित्रोदा यांना ट्रोल केले असून अनेक मीम्स त्यांच्यावर टाकण्यात आल्या आहेत. काँग्रेसलाही पित्रोदा हे ‘अवघड जागचे दुखणे“ होऊन बसल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.