महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर केरळच्या धर्तीवर नियंत्रण आणा

11:18 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महापौरांच्या बैठकीत नगरसेवकांनी मांडल्या सूचना

Advertisement

बेळगाव : शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिकांवर व लहान मुलांवर कुत्र्यांकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही गंभीर बाब असून केरळच्या धर्तीवर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निकालात काढला पाहिजे, अशी मागणी नगरसेवकांनी महापौरांच्या बैठकीत केली. यावर विचार करण्याचा निर्णय बैठकीमध्ये उपस्थित नगरसेवकांनी घेतला. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत चालले आहेत.यामुळे शहरवासियांसह लहान मुलांना धोकादायक परिस्थितीमध्ये वावरावे लागत आहे. रात्रीच्यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांवरही कुत्र्यांकडून हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे ही गंभीर बाब असून या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यासाठी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निकालात लावणे आवश्यक असल्याचे नगरसेवक शंकर पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केरळच्या धर्तीवर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Advertisement

केरळमध्ये सर्वोच्च न्यायालयातून मान्यता घेऊन भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यात आले आहे.अशक्त व वय झालेल्या कुत्र्यांची संख्या न्यायालयाच्या आदेशावरून कमी करण्यात आली आहे. शहरामध्येही त्याच धर्तीवर भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी न्यायालयीन प्रक्रियेनुसार कार्यवाही करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनीही ही समस्या गंभीर असून न्यायालयीन प्रक्रियेनुसार यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे सांगून त्यावर गांभीर्याने विचार व्हावा, असे मत मांडले. आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजिकरणासाठी जागेचा अभाव असून योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. यावर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article