For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कंत्राटदारांचे भजन-पोवाड्यातून सरकारला गाऱ्हाणं; थकीत बिलांसाठी कोल्हापुरात अभिनव आंदोलन!

02:10 PM Apr 16, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कंत्राटदारांचे भजन पोवाड्यातून सरकारला गाऱ्हाणं  थकीत बिलांसाठी कोल्हापुरात अभिनव आंदोलन
Advertisement

                                   जिल्हा परिषदेसमोर कंत्राटदारांचे भजन

Advertisement

कोल्हापुर - शासकीय कामांची थकीत बीलं तातडीने मिळावीत या मागणीसाठी आज कोल्हापुरात कंत्राटदारांनी भजन पोवाड्यातून सरकारला गाऱ्हाणं घातलंय..कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर सुरू असणाऱ्या आजच्या आंदोलनांच्या दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांनी अभिनवं आंदोलन केलंय..कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटदारांची शासकीय कामांची जवळपास 900 कोटींची बीलं थकीत आहेत..

कंत्राटदारांनी कर्ज काढून , दागिने विकून शासकीय कामं केलीतं..मात्र शासनाकडून केलेल्या कामांची बीलचं थकीत आहेत.. शिवाय थकीत बीलं असताना नवीन कामांची टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे..त्यामुळे राज्यभरातील कंत्राटदार आक्रमक झाले असून कोल्हापूरात कालपासून कंत्राटदारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय..

Advertisement

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे..दरम्यान आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांनी भजन आणि पोवाड्यातून आपल गाऱ्हाणं मांडून सरकारचं लक्ष वेधलयं..

संपुर्ण व्हिडिओ पहा  👇

 

Advertisement
Tags :

.