एमटीसीकडून 500 ईव्ही बसचे अशोक लेलँडला कंत्राट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ओएचएम ग्लोबल मोबिलिटी, व्यावसायिक वाहन निर्माता अशोक लेलँडचे युनिट, चेन्नई-स्थित मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून 12 मीटर लांबीच्या 500 अल्ट्रा-लो-फ्लोअर इलेक्ट्रिक बससाठी कंत्राट मिळाले आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, अशोक लेलँडची दुसरी उपकंपनी स्विच मोबिलिटी मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एमटीसी) सोबतच्या करारानुसार ओएचएमला स्विच ईआयव्ही 12 मॉडेल बसेस पुरवणार आहे. यापैकी 400 बसेस विना वातानुकूलित असतील, तर 100 बसेस वातानुकूलित असतील. ओएचएम ही अशोक लेलँडची इलेक्ट्रिक वाहतूक शाखा आहे, जी ‘मोबिलिटी-एज-ए-सर्व्हिस’ व्यवसायावर केंद्रित आहे.
ईव्ही वाहतुकीकडे वाटचाल
अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शेनू अग्रवाल म्हणाले, ‘आम्ही इलेक्ट्रिक वाहतुकीकडे वाटचाल करण्यासाठी वचनबद्ध आहोत. एमटीसी सोबतची ही भागीदारी स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.