कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

04:55 PM Apr 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

चार महिन्यांपासूनचा रखडलेला पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम न मिळाल्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते.त्यामुळे गेले चार दिवस सावंतवाडी शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. परंतु कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचा रखडलेला पगार आणि पीएफची रक्कम अदा करण्याच्या तसेच नवीन टेंडर प्रमाणे नवीन दर लागू करण्याच्या आश्वासनाअंती अखेर 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड.अनिल केसरकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर, शिवसेना युवा नेते प्रतीक बांदेकर, मनसे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी पुढाकार घेऊन यशस्वी शिष्टाई केली .दरम्यान ,कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे चार दिवस शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता . नगरपालिकेच्या नवनियुक्त मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन देखील शहरातील नागरिकांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती केली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर, रवी जाधव, प्रतीक बांदेकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर, राजू कासकर, केतन सावंत , सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ, माहिती अधिकारी सुशील चौगुले तसेच कंत्राटी कर्मचारी प्रमुख बाबू बरागडे, विनोद काष्टे, राजू मयेकर, सागर खोरागडे, शोहेब शेख उपस्थित होते .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # sawantwadi # marathi news #
Next Article