खानापूर तालुक्यात पावसाची संततधार
नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ : हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलावर पाणी आल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प
प्रतिनिधी/ खानापूर
गेल्या आठ-दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पुनर्रागमन केले आहे. रविवारी दुपारपासून पावसाने जोर केला आहे. सोमवारी आणि मंगळवारी पावसाने झोडपल्याने तालुक्यातील नदी, नाल्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलावर पाणी आल्याने काहीकाळ या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मंगळवारीही संततधार कोसळत राहिल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्याच्या जांबोटी, कणकुंबी भागात, तसेच भीमगड अभयारण्यातील पश्चिम भागात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जोरदार झोडपल्याने नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. हवेत प्रचंड गारठा वाढला असून जोरदार वाराही वाहत आहे. त्यामुळे वातावरणात बराच बदल झाला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असला तरी पावसामुळे आणि वातावरणामुळे बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप उभारणीच्या कामातही अडथळा निर्माण झाला आहे. तसेच मूर्तिकारही मूर्ती रंगवण्यासाठी हिटरचा वापर करत आहेत. मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याच्या गडबडीत आहेत.
पावसामुळे रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. शहरातील खानापूर-हल्याळ रस्त्यावरील राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे पुन्हा ख•dयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ख•dयांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहने चालविताना धोका निर्माण झाला आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना ख•dयांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. गणेश चतुर्थीसाठी बाहेरगावी असलेले चाकरमानी गावी येत असल्याने रस्त्यांवर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रुमेवाडी नाका ते करंबळ क्रॉस या रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात ख•s पडून रस्त्याची चाळण झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने डागडुजी करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रुमेवाडी क्रॉसजवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
रुमेवाडी नाक्याजवळ खानापूर-नंदगड रस्त्याशेजारी असलेले झाड उन्मळून पडले. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. खानापूर-नंदगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. दुपारी साडेतीनच्या दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. मात्र त्यावेळी रस्त्यावरून दुचाकी अथवा चारचाकी वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. काहीकाळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. वनखात्याने आणि स्थानिकांनी झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. खानापूर-नंदगड मार्गावरील दोन्ही बाजूला शेकडो वर्षाची जुनी झाडे आहेत. ही झाडे जुनाट झाल्याने उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनखात्याने जुनाट झाडे तातडीने हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वनखात्याने या रस्त्यावरील दोन झाडे हटविली आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जुनाट झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यासाठी वनखात्याने झाडांचे सर्वेक्षण करून जुनी झाडे त्वरित हटवावित, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांतून होत आहे.