महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनगोळ येथे दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा

11:05 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : अनगोळ परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून वारंवार दुरुस्ती करून देखील दूषित पाणी वितरीत केले जात असल्याने रोगराईचे प्रमाण वाढले आहे. आधीच वाढता पाऊस व गारठ्यामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या अधिक असताना दूषित पाण्यामुळे रोगराई पसरत आहे. लक्ष्मी टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र स्वच्छता केल्यानंतर स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, असे एलअॅण्डटीकडून सांगितले होते. परंतु अद्यापही तसाच पुरवठा होत आहे. अनगोळसह इतर उपनगरांमध्येही दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यानंतरही दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच आहे.

Advertisement

साथीच्या रोगांचा फैलाव 

Advertisement

पाण्यात लालसर मातीचे कण असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे हे पाणी घरात वापरायचे कसे? असा प्रश्न आहे. सध्या साथीच्या रोगांचा फैलाव सुरू असताना या दूषित पाण्याच्या सेवनामुळे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जावा, अशी मागणी होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article