For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाकेड घाटात कंटेनर उलटून आग

01:46 PM Mar 02, 2025 IST | Radhika Patil
वाकेड घाटात कंटेनर उलटून आग
Advertisement

लांजा : 

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील एका वळणावर शुक्रवारी रात्री 10.15 च्या सुमारास कंटेनर (एमएच 46 बीयु 3872) उलटून अपघात झाला. &ंअपघातात कंटेनर चालक व क्लिनर हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच भीषण आग भडकली.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नसिर नावलेकर, पोलीस कॉन्स्टेबल नीतेश राणे, शिवाजी कळंत्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सुर्वे तसेच महामार्ग ठेकेदार यांच्याकडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आला. राजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राजापूर अग्निशमन दलाचे चालक राजू कणेरी, फायरमन अशोक गार्डी, वैभव कांबळी, वाकेड पोलीस पाटील प्रशांत भितले, सरपंच संदीप सावंत, जिजाऊ संस्थेचे योगेश पांचाळ, महेश देवऊखकर, जयवंत जाधव, नंदकुमार सुर्वे, राजू जाधव, मंगेश लांजेकर, मिलिंद गुरव, शिवा उकली, विवेक कनावजे यांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले. आगीत कंटेनर संपूर्ण जळून खाक झाला असला तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.