For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएसआय अन् दहशतवाद्यांदरम्यान ‘पॉर्न वेबसाइट्स’द्वारे संपर्क

06:45 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयएसआय अन् दहशतवाद्यांदरम्यान ‘पॉर्न वेबसाइट्स’द्वारे संपर्क
Advertisement

भारताच्या कठोर कारवाईमुळे ओढवली वेळ : दहशतवादी म्होरक्यांशी संवादासाठी ठरले माध्यम

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि सुरक्षा यंत्रणांच्या कठोर सतर्कतेदरम्यान दहशतवादी संघटनांनी स्वत:च्या रणनीतिंमध्ये मोठा बदल केला आहे. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्सच्या गैरवापराचा भांडाफोड झाल्यावर आता पाकिस्तानची गुप्तचर यंत्रण आयएसआय आणि दहशतवादी संघटनांचे म्होरके संपर्क प्रस्थापित करण्यासाठी पॉर्न वेबसाइट्स आणि विशेष एनक्रिप्टेड अॅप्सची मदत घेत आहेत. या नव्या गुप्त संचार मॉडेलचा खुलासा रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

Advertisement

पारंपरिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करडी नजर नसल्याने दहशतवादी आता पॉर्न वेबसाइट्सवर देण्यात येणाऱ्या रियल-टाइम चॅट टूल्सचा फायदा घेत आहेत. साधारणपणे डेटिंग किंवा आसपासच्या लोकांना शोधणाऱ्या या फीचर्सचा वापर करत दहशतवादी म्होरके जम्मू-काश्मीरमधील नव्या कॅडर्सना गुप्त निर्देश पाठवत  कारवाया घडवून आणत आहेत. यातील अनेक अॅडल्ड अॅप्स भारतात प्रतिबंधित आहेत, परंतु दहशतवादी व्हीपीएनच्या मदतीने अवैध रुपाने त्यांच्या एपीके फाइल डाउनलोड करत त्यांचा वापर करत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर फैलावलेल्या या नेटवर्कला ट्रॅक करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अनेक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर नजर ठेवून आहेत. दहशतवादी ‘कोटेक्स’ आणि ‘कोनियन’ यासारख्या मेसेजिंग अॅप्सचा वापर करत आहेत, हे अॅपस युजरची ओळख लपविण्यासाठी एनक्रिप्टेड नोड्सद्वारे डाटाला रुट करतात. फ्रान्समध्ये विकसित एक अॅप आणि व्हिएतनामच्या अनेक अॅप्सवर नजर ठेवली जातेय. हे अॅप्स कुठलेही सिमकार्ड किंवा मोबाइल क्रमांकाच्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन प्रदान करतात, ज्यामुळे युजरला ट्रॅक करणे जवळपास अशक्य ठरले. ‘मूनचॅट’ यासारख्या प्लॅटफॉर्म्सच्या चीनशी संबंधित वर्जनचा वापर होत असल्याचा संशय आहे. हे प्लॅटॅफॉर्म कुठल्याही पारंपरिक नोंदणीशिवाय काम करतात.

2जी नेटवर्कवरही काम करणारे तंत्रज्ञान

दहशतवाद्यांनी व्हॉट्सअॅप, सिग्नल आणि फेसबुक मेसेंजर यासारख्या सामान्य अॅप्सचा वापर जवळपास बंद केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. खोऱ्यात इंटरनेट वेग कमी असल्यावरही काम करणाऱ्या अॅप्सना दहशतवादी प्राधान्य देत आहेत. हे अॅप्स मंद 2जी किंवा ईडीजीई नेटवर्क वेगावरही सहजपणे संचालित होता. यातील काही अॅप्स डाटाच्या सुरक्षेसाठी आरएसए-2048 यासारख्या मजबूत एनक्रिप्शन अल्गोरिदम आणि सेल्फ-डिस्ट्रक्ट मेसेजिंग फीचर्सचा वापर करतात, ज्यामुळे डाटा थर्डपार्टीच्या पोहोचपासून दूर राहतो.

विदेशी व्हर्च्युअल सिमकार्डच्या नेटवर्कला उदध्वस्त करण्यासाठी सुरक्षा दल कारवाई करत असताना हा नवा ट्रेंड समोर आला आहे. व्हर्च्युअल सिम तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदा 2019 च्या पुलवामा हल्ल्यादरम्यान झाल्याचे समोर आले होते. जैश-ए-मोहम्मदचे आत्मघाती दहशतवादी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 40 हून व्हर्च्युअल सिमचा वापर केला होता असे एनआयएने शोधून काढले होते. युवा वर्गाची दिशाभूल करणे, त्यांचे ब्रेनवॉश करणे आणि नव्या सदस्यांच्या भरतीसाठी अशाप्रकारच्या अपारंपरिक मार्गांची निवड दहशतवादी संघटना करत आहेत. परंतु भारतीय सुरक्षा आणि सायबर यंत्रणा स्वत:च्या देखरेख संरचनेला सातत्याने अपग्रेड करत या ऑफ-ग्रिड संचार चॅनेल्सना ट्रॅक करून दहशतवाद्यांचे कट उधळून लावत आहेत.`

Advertisement
Tags :

.