महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुकामेव्याचे सेवन गरजेचे : डिसिल्वा

12:17 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगावात ‘अल-अब्राह’ सुकामेवा दालनाचे उद्घाटन

Advertisement

मडगाव : माणसाला ऊर्जा आणि जीवनसत्वे चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी सुकामेव्याचे सेवन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनी सांगितले. मडगावातील माबाय हॉटेलाखालील ‘अल-अब्राह’ या सुकामेवा दालनाचे उदघाटन केल्यानंतर त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी स्थानिक नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर कवळेकर उपस्थित होत्या. सुकामेव्याचे सेवन केल्याने चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळत असते. मुलांना सुकामेवा खाण्याची सवय लहानपणापासून लावणे गरजेचे असते. त्यामुळे मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होण्यास मदत होते, असे डिसिल्वा यांनी यावेळी सांगितले. नव्याने खोलण्यात आलेल्या वरील सुकामेवा दालनाची दुबई तसेच बेंगळूर व अन्य ठिकाणी आस्थापने आहेत. आता गोव्यातही दालन खोलण्यात आले आहे. विविध प्रकारच्या सुकामेव्यांबरोबर चॉकलेट, अगरबत्त्या, अत्तरे व सौंदर्यप्रसाधने येथे उपलब्ध करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article