For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गनगरीतील बांधकाम कामगारांचे 'आक्रोश' आंदोलन

सिंधुदुर्गनगरीतील बांधकाम कामगारांचे  आक्रोश  आंदोलन
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : मागील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बांधकाम कामगारांच्या लाभ योजनांच्या प्रस्तावांबाबत अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत गणेश चतुर्थीपूर्वी ७,५०० अर्ज निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सिंधुदुर्गनगरी येथे मंगळवारी झालेले शेकडो बांधकाम कामगारांचे 'आक्रोश' आंदोलन स्थगित करण्यात आले. विविध कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुमारे ३५० ते ४०० नोंदणीकृत बांधकाम कामगार सहभागी झाले होते.

Advertisement

सिंधुदुर्गनगरी येथे आज मंगळवारी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाबाहेर जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने एकत्र आले. स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी प्रलंबित लाभ प्रस्ताव, नोंदणी व नूतनीकरण अर्ज, किट वितरणातील विलंब आणि आरोग्य तपासणी योजनेतील अनियमितता यासह विविध प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनात रत्नसिंधू बांधकाम कामगार संघटनेचे अशोक बावलेकर, श्रमिक कामगार संघटनेचे प्राजक्त चव्हाण, कोंकण श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचे संतोष तेली, बांधकाम कामगार कल्याणकारी संघटनेचे बाबल नांदोसकर व अनिल कदम तसेच निवारा बांधकाम कामगार संघटनेचे मंगेश चव्हाण, सतीश कदम, संजय सावंत, महेश ढवळे, एकनाथ नेरूरकर, अरविंद सावंत आणि मंगेश नारीनग्रेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.