बांधकाम कामगारांचे भवितव्य घडवण्याचे कार्य कौतुकास्पद- आमदार पी. एन. पाटील
पाडळी खुर्द येथील राष्ट्रीय बांधकाम कामगार कार्यालयाचा 7 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिपादन
कसबा बीड / प्रतिनिधी
पाडळी खुर्द तालुका करवीर येथील राष्ट्रीय बांधकाम कामगार कार्यालयाचा 7 वा वर्धापन दिन संपन्न झाला. हा वर्धापन दिन करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी बोलताना आमदार पी. एन. पाटील यांनी बांधकाम कामगाराचे भवितव्य घडविण्याचे कार्य संजय सुतार यांच्या माध्यमातून होत आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
जवळपास 1500 पेक्षा जास्त कामगारांना शासनाच्या विविध योजना व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने संजय सुतार यांच्या माध्यमातून होत आहे. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची समाजाला व देशाला गरज असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कवठेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, आदींनी आपली मनोगते व्यक्त झाली. बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सुतार यांनी पी. एन. पाटील यांच्या आशिवार्दाने व सहकार्याने माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस बांधकाम कामगारांसाठी असमान्य कार्य करू शकलो असे सांगितले.
यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, कृषी बाजार समितीचे अध्यक्ष भारत पाटील, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कवठेकर, पाडळी खुर्द गावचे सरपंच तानाजी पालकर, चाफोडीचे सरपंच संध्या काशिद, कामगार संघटनेचे जिल्हा सचिव सुनिता सुतार, सर्व बांधकाम कामगार कार्यालयाचे प्रतिनिधी, सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुनिता सुतार यांनी व आभार विठ्ठल कोपार्डे यांनी केले.
आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भोगावती साखर कारखान्याची निवडणूकीत 24 उमेदवार निवडून येऊन नेत्रदीपक यश मिळविले म्हणून बांधकाम कामगार संघटनेकडून आमदार पी. एन. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.