For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम क्षेत्रातील कंपनी स्क्वेअरयार्ड्स बनली युनिकॉर्न

06:28 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांधकाम क्षेत्रातील कंपनी स्क्वेअरयार्ड्स बनली युनिकॉर्न
Advertisement

900 कोटी रुपयांची  केली उभारणी : व्यवसाय विस्तारासाठी करणार रक्कम खर्च

Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

बांधकाम क्षेत्रातील सल्लागार कंपनी स्क्वेअरयार्ड्स हिने अलीकडेच गुंतवणूकदारांकडून 900 कोटी रुपयांची उभारणी केली असून ही कंपनी आता युनिकॉर्न गटामध्ये समाविष्ट झाली आहे.

Advertisement

कंपनीने वरील रक्कम ही डोक्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी तसेच व्यवसाय वाढीसाठी वापरणार असल्याचे म्हटले आहे. समभाग व इतर माध्यमांतून कंपनीने वरील रक्कम उभी केली आहे. यायोगे ही कंपनी आता युनिकॉर्न बनली आहे. सदरच्या कंपनीने मागच्या आर्थिक वर्षात 2086 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला होता.

आर्थिक स्थिती व कंपनीची ओळख

वर्षाच्या आधारावर महसुलात 48 टक्के इतकी चांगली वाढ नोंदविली होती. सदरची कंपनी स्थावर मालमत्तांचा शोध, अंतर्गत सेवा, खरेदी-विक्री व्यवहार, गृहकर्ज कर्ज, अंतर्गत सजावट अशा विविध सेवा सादर करते. वरील उभारलेल्या निधीचा कंपनी व्यवसाय विस्तारासाठी करणार असून आधुनिक तंत्रज्ञानासाठीही काही रक्कम खर्च केली जाणार आहे.

लवकरच आयपीओ

बांधकाम क्षेत्रात कार्यरत स्क्वेअरयार्ड ही कंपनी वरील मोठी रक्कम उभारण्यात यशस्वी झाली असून सोबतच कंपनी आपला आयपीओ आणण्याचाही विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. सदरचा आयपीओ कधी आणायचा याबाबत कंपनी प्राथमिक स्तरावर तयारी करत असल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.