चाबहार-जहेदान रेल्वेमार्गाची निर्मिती पूर्ण
भारताला मिळाला नवा मार्ग : 730 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग : इराणकडून घोषणा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताला अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग मिळाला आहे. इराणने चाबहार-चेहदान रेल्वेमार्ग पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. या घोषणेसोबत भारतासाठी सुमारे एक दशकापासून रखडलेली अपेक्षा पुन्हा जागृत झाली आहे. मध्य आशिया आणि रशियापर्यंत सामग्रीच्या वाहतुकीसाठी आगामी काळात यामुळे मोठी मदत होण्याची शक्यता आहे.
इराणने 730 किलोमीटर लांब चाबहार-जहेदान रेल्वेमार्गाचे काम पूर्ण केले आहेस. भारतासाठी हा केवळ शेजारी देश अफगाणिस्तान, मध्य आशिया अणि रशियापर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग नसून रणनीतिक स्वरुपात देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इराणचे जहेदान शहर हे अफगाणिस्तानच्या सीमेवर असून तेथून पाकिस्तानची सीमा देखील नजीक आहे.
अफगाणिस्तानपर्यंत पोहोचणार
या प्रकल्पावर अनेक वर्षांपासून काम सुरू होते आणि आगामी 3-4 महिन्यांमध्ये येथे रेल्वे धावू लागणार आहे. यामुळे मध्य आशियाच्या अनेक देशांपर्यंत वाहतूक सुगम होणार आहे. भारताच्या चाबहार बंदर प्रकल्पाशी चाबहार-जहेदान रेल्वेमार्ग संबंधित आहे.
अमेरिकेचे निर्बंध हटण्याची प्रतीक्षा
भारत इराण सरकारसोबत सातत्याने चाबहार बंदराच्या संचालनावरुन संपर्कात आहे. चाबहार बंदरावरील अमेरिकेचे निर्बंध दूर होताच याच्या संचालनाचा अधिकार भारत पूर्वीप्रमाणे स्वत:कडे घेऊ इच्छितो आणि बंदर प्राधिकरणासोबतच्या चर्चेत हा अत्यंत प्रमुख मुद्दा आहे. ओमानच्या उपसागरात स्थित चाबहारला बंदराला हा रेल्वेमार्ग जेहदान शहराशी जोडतो, हे शहर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेच्या अत्यंत नजीक आहे. प्रारंभी हा रेल्वेमार्ग केवळ 628 किलोमीटर लांबीचा होता. या प्रकल्पात भारतही सामील होता आणि मे 2016 मध्ये यावरून इराणसोबत एक सामंजस्य करारही झाला होता. परंतु यावर कुठलीच गुंतवणूक करणे किंवा साधनसामग्री वापरण्यापूर्वी एका कूटनीतिक रणनीतिच्या अंतर्गत भारताने स्वत:ला चाबहार बंदरापर्यंतच मर्यादित केले होते.
चाबहार-जहेदान रेल्वेमार्ग
??चाबहार आणि जहेदानदरम्यान 730 किलोमीटर लांब रेल्वेमार्गावर एकूण 33 स्थानके.
??या रेल्वेमार्गात 39 बोगदे निर्माण करण्यात आले असून 201 पूल उभारण्यात आले आहेत.
??इराणचे अधिकारी या रेल्वेमार्गाची अंतिम सुरक्षा तपासणी करत असून सर्व मंजुरी मिळताच सेवा सुरू.