महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हुक्केरीत हायटेक न्यायालयीन इमारत उभारू

10:00 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आश्वासन : हुक्केरी न्यायालयीन आवारात प्रचार

Advertisement

बेळगाव : हुक्केरी येथील न्यायालयासाठी नवीन इमारत उभारण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. नवीन इमारत निर्माण करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. हुक्केरी शहरातील न्यायालय आवारातील भवनमध्ये शुक्रवारी चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार करताना ते बोलत होते. हुक्केरी येथील कोर्टच्या नूतन इमारतीसाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. यासाठी कॅरगु• येथे जागा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच हायटेक स्वरुपाची इमारत निर्माण करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील न्यायालयांच्या सुधारणेसाठी अनेक विशेष योजना तयार करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रायबाग आणि चिकोडी न्यायालयीन इमारत उभारण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. या माध्यमातून न्यायालयीन व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले, असे त्यांनी सांगितले. यावेळी हुक्केरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिस वंटमुरी, माजी अध्यक्ष आर. पी. चौगुला, उपाध्यक्ष बी. एम. जिरनाळी, कार्यदर्शी एस. जी. नदाफ, विठ्ठल गस्ती, अमरीश बागेवाडी, ज्येष्ठ वकील बी. बी. बान्नप्पगोळ, के. एल. जिरनाळी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article