For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओटवणे घाटीत अपघात झाल्यास बांधकाम खाते जबाबदार

03:45 PM Apr 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ओटवणे घाटीत अपघात झाल्यास बांधकाम खाते जबाबदार
Advertisement

ओटवणे भाजपा शक्ति केंद्र प्रमुख प्रशांत बुराण यांचा इशारा

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

चराठा - ओटवणे घाटरस्त्या दरम्यानच्या मोरीचे बांधकाम संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत ठेवल्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन डागडूजी न केल्यास या ठिकाणी होणाऱ्या अपघातास ठेकेदारासह संबंधित खाते जबाबदार राहणार असल्याचा इशारा ओटवणे भाजपा शक्ती केंद्रप्रमुख प्रशांत बुराण यांनी दिला आहे. ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. ओटवणे जनतेला सावंतवाडीत येण्या जाण्यासाठीही हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र ओटवणे घाटीतील ही मोरी खचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील मोरीचा पृष्ठभाग खचला असून येत्या पावसाळ्यात ही मोरी आणखी खचून ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक ऐन पावसाळ्यात ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत या मोरीची दुरुस्ती करावी. अशी प्रशांत बुराण यांची मागणी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.