For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम कंपनी के रहेजा कॉर्पचा येणार आयपीओ

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांधकाम कंपनी के रहेजा कॉर्पचा येणार आयपीओ
Advertisement

700 दशलक्ष डॉलरची करणार उभारणी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

बांधकाम क्षेत्रातील कंपनी के रहेजा कॉर्प लिमिटेड यांचा लवकरच आयपीओ आणण्याचा विचार आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून 700 दशलक्ष डॉलरची उभारणी करण्याचाही विचार कंपनी करते आहे. यावर्षी आयपीओ सादर झाल्यास देशातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठ्या मूल्याची ही कंपनी ठरणार आहे. मुंबईमध्ये मुख्य कार्यालय असणाऱ्या कंपनीचे बाजारमूल्य 7 अब्ज डॉलर्सवर न्यायचे आहे. आयपीओसाठी सल्लागार नेमण्याचे कार्य सुरू असून विविध बँकांसोबत प्राथमिक स्तरावर चर्चाही कंपनी करते आहे. यापूर्वी बांधकाम क्षेत्रातील कंपनी डीएलएफ लिमिटेड यांनी 2007 मध्ये आयपीओ लॉन्च केला होता. त्यातून 9188 कोटी रुपये उभारले होते. या दरम्यान बेंगळूरच्या आरएमझेड कॉर्प यांनीही आयपीओ आणण्याचा विचार चालवला असून या मार्फत एक अब्ज डॉलर्स उभारण्याची योजना बनवली जात आहे.

Advertisement

रहेजा कॉर्पचा विस्तार

रहेजा कॉर्प ही कंपनी व्यावसायिक आणि रहिवासी मालमत्तांच्या विकासामध्ये लक्ष घालते. त्याचबरोबर शॉपिंग मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सची साखळी चालवते. यासोबतच चॅलेट हॉटेल्स लिमिटेड नावाने हॉटेल चेन चालवते. तसेच देशातील चार मोठ्या शहरांमध्ये इनॉर्बिट नावाने मॉल्सही कंपनीचे कार्यरत आहेत. शॉपर्स स्टॉप ची मालकीही यांच्याकडे असून जवळपास 45 शहरांमध्ये 100 डिपार्टमेंटल स्टोअर्स कार्यरत आहेत.

Advertisement
Tags :

.