महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसची जाहीरनामा समिती स्थापन

06:43 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पी चिदंबरम यांच्यासह 16 नेत्यांचा समावेश : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 16 नेत्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती आगामी लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा ठरवणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. तर छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांना समितीचे निमंत्रक बनवण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कृती करताना दिसत आहे. काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून त्यात पी. चिदंबरम आणि टी. एस. सिंहदेव यांच्याशिवाय आणखी 14 नेत्यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वधेरा, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आनंद शर्मा, जयराम रमेश, शशी थरूर, गइखंगम, गौरव गोगोई, प्रवीण चक्रवर्ती, इम्रान प्रतापगढी, के राजू, ओंकार सिंग मरकाम, रंजीत रंजन, जिग्नेश मेवाणी आणि गुरदीप सप्पल यांचा समावेश असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीचा दिल्लीत पार पडलेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी तात्काळ प्रभावाने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत नुकत्याच झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने पुढील वषी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीपासून काँग्रेस कृतीत उतरली असून आगामी निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी काँग्रेस हायकमांडने उत्तर प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील पक्षाच्या नेत्यांच्या बैठकाही घेतल्या आहेत. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षासाठी संसाधने उभारण्यासाठी काँग्रेसने अलीकडेच ‘डोनेट फॉर देश’ ही क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 1.38 लाख रुपये देणगी देऊन पक्षाच्या ऑनलाईन क्राउडफंडिंग कार्यक्रमाची सुरुवात केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article