महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी मतदारसंघात 130 ठिकाणी संविधान गौरव दिन साजरा होणार

11:57 AM Nov 23, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

महाविकास आघाडी संविधानाचा फायदा घेत जातींमध्ये तेढ निर्माण करतेय ; चंद्रकांत जाधव

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

भारतीय जनता पक्ष आणि अनुसूचित जाती मोर्चा तर्फे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथ स्तरावर संविधान गौरव दिन 130 ठिकाणी साजरा करण्यात येणार असे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव यांनी आज सावंतवाडी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, भाजपने आजपर्यंत संविधान जपण्याचे काम केले आहे. परंतु ,महाविकास आघाडीचे नेते संविधानाचा फायदा उचलत जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. तसेच भाजप संविधान बदलणार अशा खोट्या अफवा विरोधी पक्षातील लोक करतायत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकांमध्ये तेढ निर्माण करणे बंद करावे. सत्तर वर्षात जनतेला संविधानाची माहितीच नव्हती परंतु, भाजपने गेल्या नऊ वर्षात लोकांना संविधानाची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली. असे प्रतिपादन अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव यांनी केले.
यावेळी अनुसूचित जाती महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सोनल जाधव, परीक्षित मांजरेकर प्रकाश जाधव, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# sawantwadi # bjp #
Next Article