For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रजासत्ताकदिनी संविधान जागृती रॅली

10:03 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रजासत्ताकदिनी संविधान जागृती रॅली
Advertisement

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती

Advertisement

बेळगाव : संविधानाची मौलिक तत्वे, हक्क आणि कर्तव्य याबाबत जनमाणसात जागृती व्हावी. या उद्देशाने संविधान जागृती रॅली काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीला या जागृती रॅलीव्दारे स्थिर चित्र भेटीला आणले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली. या बैठकीत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. प्रजासत्ताक दिनी जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधान जागृती रॅलीचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर ही जागृती रॅली जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायत आणि शासकीय कार्यालयांना भेट देणार आहे. यावेळी संविधानातील मूल्ये, कर्तव्य आणि हक्क याबाबत जनजागृती होणार आहे. ही रॅली महिनाभर चालणार आहे. यासाठी जिल्हा पंचायत, महसूल खाते, पोलीस खाते, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग यासह इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांनी तत्पर राहणे गरजेचे आहे.

अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

शासनाचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असल्याने तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, विकास ग्राम पंचायत अधिकाऱ्यांनी समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे गरजेचे आहे. अशा सूचनाही जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी केल्या. यावेळी नगरविकास खात्याचे योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलपती राजश्री जैनापुरे, माहिती विभागाचे गुरूनाथ कडबुर, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या विद्यावती बजंत्री, महिला आणि बाल कल्याण खात्याचे बसवराज यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.