For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिन्ही जिल्ह्यांचे मतदारसंघ जाहीर

01:24 PM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिन्ही जिल्ह्यांचे मतदारसंघ जाहीर
Advertisement

उत्तर गोव्यात पूर्वीचेच 19 मतदारसंघ कायम

Advertisement

पणजी : भारतीय निवडणूक आयोगाने गोवा विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली असून उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती या तिन्ही जिल्ह्यांसाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात, याचाही तपशील जारी केला आहे. आयोगाचे प्रधान सचिव अजय कुमार यांनी सदर अधिसूचना जारी केली असून एकूण 40 विधानसभा मतदारसंघ आता तिन्ही जिल्ह्यांत समाविष्ट करण्यात आले आहेत.

उत्तर गोव्यात पूर्वीचेच मतदारसंघ

Advertisement

आयोगाने उत्तर गोवा जिल्ह्यातील 19 विधानसभा मतदारसंघ जसेच्या तसे कायम ठेवले असून दक्षिण गोवा जिल्ह्यात समाविष्ट असलेले 21 विधानसभा मतदारसंघ फोडून त्यातील पाच मतदारसंघ कुशावती या नवीन तिसऱ्या जिल्ह्यात सामील केले आहेत. या नवीन बदलामुळे राजकीय समीकरणे बदलणार की नाही? असा प्रश्न उभा राहिला असून तिन्ही जिल्ह्यातील मतदारसंघांची विभागणी पाहता त्यात कुठेही समतोलपणा दिसून येत नाही. ही विभागणी कशाच्या आधारावर करण्यात आली त्याचा खुलासाही आयोगाने केलेला नाही. फोंडा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर त्याचा ठपका विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर ठेवून आयोगासह राज्य सरकारवर, भाजपवर जोरदार टीका केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेऊन आयोगाने गोवा विधानसभेची निवडणूक तयारी आगावू करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.