Sangli News : कडेगाव परिसरात बिबट्यांचे सातत्याने दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
कडेगाव तालुक्यात बिबट्यांचा वाढला त्रास
कडेगाव : वांगी, शिवणी तसेच वडियेरायबाग परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होऊ लागण्याने या परिसरातील लोक हैराण झाले आहेत. तर वाड्या-वस्त्यावरील नागरिकामध्ये दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याबाबत वनखात्याने लवकरात लवकर कार्यवाही करून बिबट्यांच्या बाबतीत प्रतिबंधात्मक कार्यवाहीकरण्याची भूमिका वनविभागाने घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.
वांगी येथील माळी मळा मोहिते मळा तसेच चव्हाण मळा शिवणी व वडियेरायबाग परिसरामध्ये बिबट्यांची चाहूल आहे. त्यामुळे नागरिकांतून भितीचे वातावरण आहे. कोणाचे रेडकू, शेळी, कुत्र्यांवरबिबट्याने हल्ला केल्याची उदाहरणे ऐकावयास मिळत आहे त्यामुळे वनविभागाने त्याची खातरजमा करून बिबट्यांच्या बाबतीत योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी अशी भुमिका यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
रानावनामध्ये वाड्या-वस्त्यावरील लहान लेकरे तसेच नागरिक यांच्या सुरक्षततेची देखील मोठी चिंता लागली आहे. त्यांच्या वरती बिबट्याने हल्ला केल्यास मानवी जिवितास देखील धोका होऊ शकतो अशा पध्दतीची भुमिका प्राणीप्रेमी व ग्रामस्थामधून व्यक्त होत आहे. त्यामुळे वनविभागाने याबाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करून बिबट्यांच्या बाबतीत प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशी भुमिका ग्रामस्थामधून व्यक्त होत आहे.