For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदुस्थानाला राजेशाहीकडे नेण्याचे कारस्थान! राहूल गांधी यांचा आरोप

10:05 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
हिंदुस्थानाला राजेशाहीकडे नेण्याचे कारस्थान  राहूल गांधी यांचा आरोप
Advertisement

  लोकशाही हवी असेल तर काँग्रेसला ‘हात‘ द्या : नागपुरात  राहुल गांधी यांचे आवाहन

Advertisement

नागपूर : स्वातंत्र्यापूर्वी देशात 500 ते 600 राजे होते. ब्रिटिश होते त्यावेळी राजांना तोफांची सलामी होत असे. पण, हिंदुस्थानातील सामान्य जनतेला कोणताही अधिकार आणि आवाज नव्हता. आज पुन्हा एकदा ते देशात राजेशाही आणीत आहेत. तुम्हाला लोकशाही हवी असेल तर काँग्रेसला ‘हात’ द्या, असे आवाहन नागपुरात काँग्रेसचा 139 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात  बोलताना राहुल गांधींनी यांनी करत भाजप व संघावर  जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी उमरोडस्थित बहादुरा येथील भारत जोडो मैदानात आयोजित ‘है तैयार हम’ महारॅलीत काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नागपुरातील महारॅलीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह देशभरातील दिग्गज काँग्रेस नेते हजर होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, पफथ्वीराज चव्हाण, कन्हैयाकुमार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला, सर्व माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. काँग्रेसने प्रदीर्घ लढाई लढून सामान्य माणसांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. आरएसएस आणि भाजपा त्यांना अधिकार देण्याच्या विरोधात होते. आज ते विद्यापीठे, न्यायालये आदी संस्थांवर ताबा मिळवित आहेत. देशात सर्व विद्यापीठांचे कुलगुरू एका संघटनेचे आहे. सामान्यांचे अधिकार आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण़ाऱ्या सर्व संवैधानिक संस्थांवर आरएसएस ताबा मिळवत आहे. मीडियाचा आवाज दाबून टाकला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी

Advertisement

महाराष्ट्र काँग्रेससाठी विशेष आहे कारण महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. इथे लोकांना काँग्रेसची विचारधारा न सांगता समजते. काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्रातील लोकांमध्ये रूजली आहे. हे लक्षात घेता तुम्ही आणि आम्ही मिळून राज्यात आणि हिंदुस्थानात जिंकायला निघालेलो आहोत, अशी भावनिक सादही राहुल गांधींनी घातली.

आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

काँग्रेसने आज स्थापना दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात महासभेचं आयोजन केलं होतं. या महासभेतील भाषणातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरूनही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ठदेशात महागाई, बेरोजगारी असे लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे सगळे प्रश्न सोडून देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येणार आहेत. मात्र तुम्ही कशालाही भुलू नका. देशाला वाचवण्यासाठी, संविधान आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी तुम्हाला इंडिया आघाडीला मत द्यायचं आहे, असं आवाहन खर्गे यांनी आपल्या भाषणातून केलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी नागपूर विदर्भाने काँग्रेसला नेहमीच साथ दिल्याचे सांगितले. येथेच आंबेडकरांची प्रगतीशील विचारधारा आणि देशाला अधोगतीकडे नेणारी रा. स्व. संघाची विचारधारा नागपुरात आहे. संघ पुरस्कृत सरकारला थांबवले नाहीतर संविधान संपुष्टात येईल असे खर्गे म्हणाले. मोदी आरएसएसच्या विचारधारेवर चालतात. ते आज ना उद्या दलितांचा आवाज बंद करतील असा आरोप खरगे यांनी केला. मीडियाकर्मी हे कामगार आहेत. त्यांच्या मागे असलेल्या कार्पोरेट कंपन्या मीडियाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. मालक सांगतात ते त्यांना ऐकावे लागते असे खर्गे म्हणाले.

याच नागपुरातून हुकुमशाहीचा सत्तेच्या विरोधात नारा दिला : पटोले

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महात्मा गांधी यांनी याच नागपुरातून हुकूमशाही सत्तेच्या विरोधात नारा दिला व संपूर्ण देशातून जनता एकवटली आणि 150 वर्षांची ब्रिटिशांची हुकूमशाही राजवट संपुष्टात आणली. नागपुरातून याच भूमितून इंदिरा गांधी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा ठराव केला होता अशी आठवणीही त्यांनी यावेळी सांगितली.

भाषणाला माणसं कोठून आणली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी यांच्या भाषणाला उपस्थिती फार कमी होती. काही लोक त्यांच्या भाषणाआधी निघून गेली होती. त्यांची थीम होती, है तयार हम.. मात्र, ते कशासाठी तयार आहेत? हे मला काही कळालं नाही. मात्र, लोकांना त्यांना ऐकायचं नाही. या देशामध्ये अनेक शूर राजे आणि राजघराणे होते. ज्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. आपलं स्वत: टिकून ठेवलं. राहुल गांधी म्हणाले, देशाच्या राजघराण्यांनी इंग्रजांसाठी साटंलोटं होतं. राजघराण्याचा अपमान करणं चुकीचं आहे. हे देशात सहन केलं जाणार नाही. भाषणाला माणसं कुठून आणली? तर, आम्हाला तर कळालंय की काही कर्नाटकमधून माणसं आणण्यात आली होतीठ, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला.दरम्यान, एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिल्या कर्मांकावर आलाच, पण कर्नाटक आणि गुजरात यांच्यापैक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली आहे. अनेकांना आरोप केले होते, मात्र या दोन्ही राज्यांपेक्षा आपल्याकडे जास्त गुंतवणूक झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केंद्रात सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू : राहुल गांधी

आम्ही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडतो त्यावेळी मोदी त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या संस्थांमध्ये ओबीसींची भागिदारी किती आहे, हे ते कधीच सांगत नाहीत. भारत सरकारचे 90 सचिव आहेत, त्यापैकी केवळ तीन हे ओबीसी प्रवर्गातील आहेत. भारतात किती ओबीसी प्रवर्गातील लोक आहेत, किती एससी प्रवर्गातील लोक आहेत, किती एसटी प्रवर्गातील लोक आहेत हे जातनिहाय जनगणनेनंतर स्पष्ट होईल. म्हणून पेंद्रात आमचे सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना करू, अशी ग्वाही राहुल गांधींनी दिली.

Advertisement
Tags :

.