महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एनआयए अधिकाऱ्यांनाच उडविण्याचा कट

10:43 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरण : संशयित दहशतवाद्यांचे पाकिस्तान कनेक्शन

Advertisement

बेंगळूर : बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम पॅफे बॉम्बस्फोटाचा तपास तीव्र केलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पाकिस्तानने रचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बॉम्बस्फोटांचे सूत्रधार मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा हे पाकिस्तानी कर्नल नामक व्यक्तीशी जोडले गेले होते. इतकेच नव्हे तर ते 2019-20 पासून आयएस अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहितीही एनआयएला उपलब्ध होती. त्यामुळे एनआयएचे अधिकारी रामेश्वरम पॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात पाकिस्तानच्या सहभागाबाबत अधिक चौकशी करत असल्याची माहिती आहे.

Advertisement

कर्नल असे कोडनेम असलेला संशयित दहशतवादी 2022 मध्ये मंगळूर येथे झालेल्या कुकर बॉम्बस्फोटात देखील सामील होता. मंगळूर कुकर बॉम्बस्फोटानंतर अबुधाबीतील कर्नल या संशयित दहशतवाद्याचे नाव समोर आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी त्याचे संबंध असून तो भारतात बॉम्ब हल्ल्यांचा कट रचत आहे. इस्लामिक स्टेटचे छोटे गट तयार करून त्यामध्ये स्थानिक तऊणांची भरती करणे हे त्याचे काम असल्याचे उघडकीस आले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये पोलिसांनी दिल्लीत इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. देशभरात असे छोटे-छोटे गट तयार करून त्यात तऊणांची भरती करून भारतात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची त्याची योजना आहे. रामेश्वरम पॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटामागेही त्याचा हात असल्याची माहिती एनआयला मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article