संगनमताने संतोष कदमला संपवले : कुरूंदवाड हद्दीत ठरवून मारले
पुतण्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : फडणीस यांच्याकडून तपास काढून घेण्याची केली मागणी
सांगली प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष विष्णू कदम याचा कुऊंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कटकारस्थान रचून निर्घृण खून केला. या खूनप्रकरणी माजी नगरसेवक मंगेश मारुती चव्हाण व त्याचा भाऊ महेश माऊती चव्हाण व त्याचे अन्य सहकारी शशिकांत साळुंखे, पोमशा पाटील, निखिल मेखले, माजी नगरसेवक बाळू गोंधळे, दादा गोंधळे, कुशल कुदळे, सुरेश दुधगावकर, स्वप्निल कोरे, गणेश जाधव, राहुल कुदळे यांचा यात सहभाग असल्याचा आरोप संतोष कदम याचा पुतण्या प्रफुल्ल कदम यांनी केला आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सांगली जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तसेच या प्रकरणांचा तपास कुरूंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्याकडून काढून घेण्याचीही मागणी केली आहे.
प्रफुल्ल कदम यांनी इमेलव्दारे हे आरोप करणारे निवेदन पाठविले आहे. गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षकांना हे पाठवले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच याप्रकरणी कुरूंदवाड पोलिसांनी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण आणि बाळू गोंधळी यांनाही नोटीस देवून याप्रकरणी बोलवले आहे.
सन 2017-18 पासून संतोष कदम हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कार्य करत होते. त्यांनी माहीती अधिकार कायद्याचा वापर करून महानगरपालिका क्षेत्रातील तसेच सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस खाते व इतर प्रशासकीय कार्यालयमधील अनेक घोटाळे, भानगडी, भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत, महानगरपालिका प्रशासन ते मंत्रालयापर्यंत तक्रारी अर्ज दाखल केल्याने अनेक आधिकारी व कर्मचारी यांना कारवाईस सामोरे जावे लागले आहे. संतोष कदम यांनी आपल्या सामाजिक जीवनात नैसर्गिक आपत्तीवेळी महानगरपालिका प्रशासन असो पोलीस प्रशासन असो महापूर काळात त्यांच्या सोबत काम केले होते व विशेष सामाजिक उपक्रम राबवून समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते त्याच सोबत वेगवेगळ्या प्रशासकीय आस्थापनांचे घोटाळे बाहेर काढत भ्रष्टाचारी लोकांना योग्य चाप बसवला होता.
मयत संतोष कदम यांच्यावर याआधी 28 डिसेंबर 2022 रोजी महापा†लके बाहेर जीवघेणा हला झाला होता. यात माजी नगरसेवक मंगेश चव्हाण व त्याचे गुंड प्रवृत्तीचे साथीदार यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यामुळे मंगेश चव्हाण व त्याच्या अन्य साथीदारांच्या पासून संतोष कदम यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक यांना याबाबत तक्रारही देखील केली होती. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षणाची विनंती केली होती परंतु पोलिसांनी संतोष कदम यांच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे संतोष कदम यांची भीती आज खरी ठरली त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपासअधिकारी रविराज फडणीस यांच्यावरही आरोप
गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक मंगेश मारूती चव्हाण व त्याचा भाऊ महेश माऊती चव्हाण आणि सध्या कुऊंदवाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचे कौटूंबिक संबंध आहेत. या कारणास्तव रविराज फडणीस यांचा या घटनेमध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे हा खुनाचा पूर्वनियोजित कट रचून जाणीवपूर्वक कुरूंदवाड या ठिकाणी हा गुन्हा घडवलेला आहे. त्यामुळे सध्याचे तपास आधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्याकडून तपास काढून घेण्यात यावा. ज्याच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांचे मागील सहा महिन्यातील मोबाईल चॅट, लोकेशन व एकमेकांसोबत झालेले मोबाईल संभाषण तसेच व्हॉट्सअप व अन्य समाज माध्यमांच्या माध्यमातून झालेला संवाद व संपर्क याचा देखील तपास करण्यात यावा.
संतोष कदम यांनी या आधी गुंड नगरसेवक मंगेश मारूती चव्हाण व त्याचा भाऊ महेश माऊती चव्हाण व त्याचे अन्य सहकारी शशिकांत साळुंखे, पोमशा पाटील, निखिल मेखले, बाळू गोंधळे, दादा गोंधळे, कुशल कुदळे, सुरेश दुधगावकर, स्वप्निल कोरे, गणेश जाधव, राहुल कुदळे यांच्यावर तडीपार करण्याबाबत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे या सर्वांचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.