महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निलंबित शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याचा विचार

11:30 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिक्षण आयुक्तांचा निर्णय : विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : विविध कारणांनी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात शिक्षकांची कमतरता असल्याने शिक्षण विभागाने निलंबित शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. निलंबित शिक्षकांना आणखी एक संधी दिली जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कामामध्ये कुचराई केल्याबद्दल काही शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते.काही ठराविक गुन्हे वगळता इतर शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हानिहाय याद्या तयार करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी याबाबत आदेश काढून निलंबित का केले आहे? याची कारणे तपासण्याची सूचना केली आहे.

Advertisement

25 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असलेल्या विभागामध्ये निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांचा विचार केला जाणार आहे. अतिथी शिक्षक नेमण्यापेक्षा निलंबित शिक्षकाला त्याठिकाणी सेवा दिल्यास एक कौशल्यपूर्ण शिक्षक शाळेला मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिस्तपालन समिती असून निलंबित शिक्षकांकडून पुन्हा त्याच चुका झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.न्यायालयात जी प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा शिक्षकांना सेवेत घेता येणार नाही.खोटी कागदपत्रे सादर करून झालेल्या शिक्षक भरती प्रकरणातील शिक्षकांना, तसेच न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिक्षकांना सेवेत घेता येणार नाही. उर्वरित शिक्षकांना मात्र सेवेत घेण्याचा विचार केला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article