कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धुण्याच्या चावीच्या संवर्धनास सुरुवात

04:52 PM May 13, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शहरातील रंकाळा तलावा लगतच्या जावळाचा गणपती ते दुधाळी या रस्त्यावर असलेल्या गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या धुण्याची चावी या वारसास्थळाच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली असून, धुण्याची चावीच्या परिसरात असलेली झाडेझुडपे काढून, नव्याने दगडी फरशी बसविण्यासाठी दगडी फरशी तयार करण्याच्या कामाला सुरु आहे.

Advertisement

शहराच्या वैभवात भर घालणारा रंकाळा तलावाचे पाणी प्रदुषीत होवून नये. याकरीता या तलावातील पाण्याचा उपयोग स्वतंत्रपणे पिण्यासाठी, शेतीसाठी, कपडे धुण्यासाठी, आणि आंघोळीसाठी कल्पकतेने करण्यात आला होता. यावेळी रंकाळा तलावानजीकच्या जावळाचा गणपती ते दुधाळीकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक सुमारे दिडशे मीटर अंतरावर धुण्याची चावी आहे. या धुण्याच्या चावीला रंकाळा तलावून थेट सायफन पध्दतीने पाणी येते आहे. या पाण्यासाठी रंकाळ्याच्या टॉवरच्या खालील तळात पाण्याचा व्हॉल आहे. अशा या धुण्याच्या चावीच्या ठिकाणी लोकांना कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी सुमारे 60 चाव्याची उभारणी करण्यात आली होती. तसेच या चाव्याच्या बाजूला एक मोठा पाण्याचा हौद सुध्दा बांधण्यात आला आहे. या हौदातील पाण्याचा वापर अद्यापी जनावरांसाठी केला जात आहे. अशा पर्यावरण पुरक धुण्याची चावीच्या परिसराच्या स्वच्छतेकडे महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष झाल्याने, या ठिकाणी झाडेझुडपे उगवतली केली. तसेच दगडी फरश्या निकळला होत्या. याची शहरातील पर्यावरणस्नेहीने दखल घेवून महानगरपालिकेकडे धुण्याच्या चावीचे संर्वधन करावे, अशी मागणी करीत होते. या मागणीची दखल घेवून महानगरपालिकेने धुण्याच्या चावीचे संवर्धन करण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून धुण्याच्या चावीच्या संवर्धनाच्या कामाला सुऊवात करण्यात आहे. पहिल्यांदा या परिसरात उगवलेली खुरडी झाडेझुडपे काढून टाकून, धुण्याच्या चावीचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यांनतर जुन्या दगडी फरशी काढून त्या ठिकाणी नव्याने दगडी फरशी बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, सध्या या ठिकाणी दगडी फरशी बनविण्यात येत आहे.

धुण्याच्या चावी ठिकाणी कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी जे पाणी वापरले जाते. ते पाणी पाटाव्दारे नजीकच्या नाल्यात सोडले आहे. त्या नाल्याच्या पाण्याचा वापर पूर्वीपासून दुधाळी परिसरात असलेल्या शेतीसाठी केला जातो आहे.

धुण्याच्या चावी या परिसराच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून, या ठिकाणी उगविलेली झाडेझुडपे काढली आहे. जुन्या दगडी फरश्या काढली, त्या ठिकाणी नव्याने दगडी फरशी बसविण्यात येणार आहे. नवीन दगडी फरशी बनविण्याचे काम सुऊ केले आहे. दगडी फरशीचे काम पूर्ण होताच. धुण्याच्या चावीचे वापरले पाणी पुढे नाल्यात सोडण्यासाठी असलेल्या गटरचेदेखील काम केले जाणार आहे.

                                                                                                                                           रणजित निकम - ठेकेदार

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article