For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युडीएफमध्ये जागावाटपावरून सहमती

06:50 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
युडीएफमध्ये जागावाटपावरून सहमती
Advertisement

केरळमध्ये काँग्रेस लढविणारा 16 जागा

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केरळमध्ये लोकसभा निवडणुकीरता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक प्रंटने (युडीएफ) जागावाटपासंबंधी चर्चा पूर्ण केली आहे. राज्यातील 20 पैकी 16 जागा काँग्रेस लढविणार आहे. आययुएमएल (इंडियन युनियन मुस्लीम लीग) 2 जागा (मलप्पुरम आणि पोन्नानी), रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी एक जागा (कोल्लम) आणि केरळ काँग्रेस एक जागा (कोट्टायम) लढविणार आहे. मुस्लीम लीगने एक अतिरिक्त जागा मागितली होती. परंतु काँग्रेसने आययुएमएलला राज्यसभेची एक जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.

Advertisement

इंडिया आघाडीत सामील भाकपने केरळमध्ये काँग्रेसला आव्हान दिले आहे. केरळमध्ये भाकप स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असून पक्षाने 4 उमेदवारही घोषित पेल आहे. वायनाड तसेच तिरुअनंतपुरम मतदारसंघातील उमेदवारही भाकपने जाहीर केले आहेत.

एलडीएफमध्ये सत्तारुढ माकपचा सहकारी असलेला भाकप राज्यात 4 जागा लढविणार आहे. भाकप महासचिव डी. राज यांच्या पत्नी एनी राज यांना वायनाडची उमेदवारी मिळाली आहे. तिरुअनंतपुरम येथे पन्नियन रविंद्रन हे पक्षाचे उमेदवार असतील. याचबरोबर व्ही.एस. सुनील कुमार हे त्रिशूरमधून तर मावेलिकारा येथून अरुण कुमार हे निवडणूक लढविणार आहेत.

2019 मध्ये चारही जागांवर पराभव

सध्या तिरुअनंतपुरममध्ये शशी थरूर तर वायनाडमध्ये राहुल गांधी खासदार आहेत. भाकपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील 4 जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नव्हता. केरळमध्ये 20 लोकसभा मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसने यातील 15 जागा, आययुएमएलने 2 जागा जिंकल्या होत्या. माकप, केरळ काँग्रेस (एम) आणि आरएसपीने प्रत्येक एक जागा जिंकली होती. काँग्रेस नेते शशी थरूर हे 2009 पासून तिरुअनंतपुरमचे खासदार आहेत. त्रिशूर या मतदारसंघात भाजपच्या वतीने दिग्गज अभिनेत सुरेश गोपी निवडणूक लढविणार आहेत.

Advertisement
Tags :

.