For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेतना केवळ मेंदूत नव्हे पेशींमध्येही

06:21 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
चेतना केवळ मेंदूत नव्हे पेशींमध्येही
Advertisement

आयआयटी मंडीचे संशोधन

Advertisement

आआयटी मंडीच्या वैज्ञानिकांनी एक ऐतिहासिक शोध लावला आहे. रोप बेशुद्धीच्या औषधावर प्रतिक्रिया देताना स्वत:च्या पेशींमधील जगाला पूर्णपणे बदलून देते असे त्यांना आढळून आले आहे. हा शोध मेंदू आणि नर्व्हस सिस्टीम नसलेल्या रोपांमध्ये चेतनेविषयी आमची समजूत बदलू शकतो.

वैज्ञानिकांनी टोमॅटो आणि वांग्याच्या कोशिकांवर एनेस्थीसियाचा प्रभाव पाहिला. त्यांनी आधुनिक लाइव सेल मायक्रोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर केला. रोपांच्या कोशिका बेशुद्ध करणाऱ्या औषधावर अत्यंत व्यवस्थित आणि कॉर्डिनेटेड पद्धतीने रिअॅक्ट होतात असे त्यांना आढळून आले.

Advertisement

रुट ब्रेन हायपोथेसिस

रोपांच्या मूळाचे टोक माहिती ग्रहण करणे आणि प्रक्रिया करण्याचे मुख्य केंद्र असते. याला रुट ब्रेन म्हटले जाते. वैज्ञानिकांनी याच हिस्स्याच्या कोशिकांचे अध्ययन केले, कारण या पारदर्शक असतात, सहजपणे पाहता येते. पहिल्या संशोधनपत्रात वैज्ञानिकांनी एनेस्थीशिया दिल्यावर कोशिकांचे अवयव क्रमाने बंद होतात हे दाखवून देल. मायटोकॉन्ड्रिया, लाइसोसोम, क्लोरोप्लास्ट आणि अन्य हिस्स्यांचे क्रमबद्ध शटडाउन होते. अखेरीस न्यूक्लियस बंद होतो, जेव्हा औषध हटविण्यात आले, तर बरोबर उलट्या क्रमाने सर्वकाही सामान्य झाले. न्यूक्लियस या पूर्ण प्रक्रियेचा मास्टर कंट्रोलर सिद्ध झाला.

महत्त्वपूर्ण शोध

दुसऱ्या प्रयोगात सर्वात आश्चर्यजनक निष्कर्ष समोर आला. रोपांच्या कोशिकांमध्ये असलेला न्यूक्लियस एनेस्थीशियादरम्यान एकाचवेळी व्यवस्थित झाले. प्रत्येक न्युक्लियसच्या आत यूक्रोमेटिन एकाचवेळी बाहेरील काठावर हलले. हे सर्व एकाचवेळी सर्व कोशिकांमध्ये घडले. भले त्यांच्यादरम्यान कुठलीच नर्वस सिस्टीम नसली तरीही हे घडले आहे. हे नॉन-लोकल कम्युनिकेशन दर्शविते. हा शोध भारतीय ज्ञानप्रणालीशी मिळताजुळता आहे. प्राचीन भारतीय दर्शन चेतनेला गैरस्थानिक आणि सर्वत्र व्याप्त मानतो. चेतना केवळ मेंदूची देणगी नसून हे कोशिकीय स्तरावरही अस्तित्वात असू शकते हे अध्ययनातून स्पष्ट होत असल्याचे प्राध्यापक लक्ष्मीधर बेहरा आणि चयन कांति नंदी यांनी सांगितले आहे. वैज्ञानिक आता या शोधाला अन्य जीवांवरही पडताळणी करत आहेत. जर तेथेही हाच पॅटर्न आढळला तर चेतनेचे सेल्युलर सिग्नेचर सार्वभौमिक असल्याचे सिद्ध होईल. आयआयटी मंडीचा हा शोध विज्ञानाच्या जगतात नवी चर्चा सुरू करू शकतो. रोप मेंदूशिवाय चेतनेचे संकेत दाखवत आहे, हे आम्हाला निसर्गाबद्दल आणखी सन्मान दर्शविण्याची प्रेरणा देतो.

Advertisement
Tags :

.