For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॉनर शिल्डस् करारात वाढ

06:02 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॉनर शिल्डस् करारात वाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

चेन्नई एफसी संघाने आपल्या आघाडी फळीत खेळणाऱ्या कॉनर शिल्डस्च्या करारात एक वर्षांसाठी मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कॉनर शिल्डस् आणि चेन्नई एफसी यांच्यात हा करार 2025 पर्यंत राहील.

2023 साली कॉनर शिल्डस्ने चेन्नई एफसी संघात प्रवेश केला होता. चेन्नई संघाकडून खेळताना त्याने 27 सामन्यात 5 गोल नोंदविले आहेत. स्कॉटलंडचा 26 वर्षीय फुटबॉलपटू कॉनर शिल्डस् हा आता चेन्नईन एफसी संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. 2023-24 च्या फुटबॉल हंगामात त्याने चेन्नई संघाकडून 27 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.