For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बेंगळूर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे पुट्टण्णा विजयी

06:22 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे पुट्टण्णा विजयी

विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप-निजद युतीला दणका

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

विधानपरिषदेच्या बेंगळूर शिक्षक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत निजद-भाजप युतीच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार पुट्टण्णा यांचा 1507 मताधिक्क्याने विजय झाला आहे. पुट्टण्णा यांना 8,260 मते मिळाली. तर पराभूत उमेदवार ए. पी. रंगनाथ यांना 6,753 मते पडली. 1239 मते अवैध ठरली.

Advertisement

बेंगळूर शिक्षक मतदारसंघात 16 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. मंगळवारी बेंगळुरात मतमोजणी झाली. मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या पुट्टण्णा यांनी शेवटपर्यंत आघाडी राखत विजयाला गवसणी घातली. त्यांनी भाजप-निजद युतीचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांना पराभूत केले. पुट्टण्णा यांना विजयी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यांचा अधिकार अवधी 11 नोव्हेंबर 2026 पर्यंत राहणार आहे.

Advertisement

यापूर्वी तीनवेळा निजदमधून नंतर एकवेळा भाजपमधून विधानपरिषदेवर निवडून आलेल्या पुट्टण्णा यांनी विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली. मात्र, तिकीट न मिळाल्याने त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाबरोबरच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर ते मार्च 2023 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी बेंगळूरच्या राजाजीनगर मतदारसंघातून तिकीट दिले. परंतु, भाजपचे उमेदवार एस. सुरेशकुमार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पुट्टण्णा यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या बेंगळूर दक्षिण मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने पुट्टण्णा यांना पोटनिवडणूक रिंगणात उतरविले. आता ते काँग्रेसमधून विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. निजदमध्ये असताना पुट्टण्णा यांनी उपसभापतीपदही भूषविले होते.

Advertisement
Tags :
×

.