महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संसदेत काँग्रेसच्या महिला खासदार बेशुद्ध

06:27 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘नीट’प्रकरणी आवाज उठविताना अत्यवस्थ : विरोधकांची सरकारकडे चर्चेची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

‘नीट’ पेपर लीक प्रकरणावर विरोधी पक्षाने शुक्रवारी लोकसभा-राज्यसभा या दोन्ही सभागृहांबरोबरच संसदेबाहेर निदर्शने करत जोरदार आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाने राज्यसभेतही या प्रकरणाचा निषेध केला. यादरम्यान राज्यसभा खासदार फुलोदेवी नेताम बेशुद्ध होऊन कोसळल्यानंतर त्यांना संसदेतून ऊग्णवाहिकेतून इस्पितळात नेण्यात आले. ही घटना घडली तेव्हा त्या ‘नीट’च्या मुद्यावर सभागृहाच्या वेलमध्ये निषेध करत होत्या. त्यांना आरएमएल ऊग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे विरोधी सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.

संसद अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी धन्यवाद प्रस्ताव मांडला. याचदरम्यान, दुसरीकडे ‘इंडिया’मधील विविध पक्षाच्या नेत्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात ‘नीट’चा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले. तसेच वेलमध्ये उतरून सरकारविरोधी घोषणाबाजी करत सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणला.  याचदरम्यान राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या खासदार फुलोदेवी नेताम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने सभागृहात गोंधळ उडाला.

फुलो देवी नेताम बेशुद्ध पडल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, ‘या सरकारमध्ये माणुसकी आणि शालीनता नाही. आमची एक सहकारी (काँग्रेस खासदार फुलो देवी नेताम) बेशुद्ध पडली आणि तिला गंभीर अवस्थेत ऊग्णालयात नेण्यात आले. तरीही सरकार ‘नीट’ प्रकरणावर गंभीर दिसत नाही, असे ते म्हणाले. आम्हाला ‘नीट’वर चर्चा हवी होती. सरकार चर्चेस तयार नसल्याने आम्ही सभागृहाच्या वेलमध्ये उतरून निषेध व्यक्त केला, आम्ही ‘नीट’वर चर्चेची मागणी केली, यालाही परवानगी देण्यात आली नाही, असे बीजेडीचे राज्यसभा खासदार सस्मित पात्रा यांनी सांगितले. टीएमसीच्या खासदार सागरिका घोष आणि काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनीही पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.

 आधी ‘नीट’वर चर्चा झाली पाहिजे : राहुल गांधी

विरोधी पक्ष संसदेत ‘नीट’वर चर्चेची मागणी करत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही ‘नीट’वर चर्चेची मागणी केली आहे. आधी ‘नीट’वर चर्चा व्हायला हवी असे त्यांनी म्हटले आहे. या मुद्यावर सरकार आणि विरोधक एकत्र आले पाहिजेत. परीक्षांमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या विद्यार्थ्यांना आधार देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

सभापतींकडून विरोधकांना सापत्न वागणूक : खर्गे

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी सरकारवर गंभीर आरोप करतानाच सभापतींनाही लक्ष्य केले. आम्हाला नीट परीक्षांमधील गोंधळाचा मुद्दा वरिष्ठ सभागृहात उपस्थित करायचा होता, परंतु सभापती जगदीप धनखड यांनी आम्हाला जाणूनबुजून अपमानित केले. त्यांनी विरोधकांकडे दुर्लक्ष केले. विरोधकांशी सभापतींची वागणूक सापत्नपणाची असल्याचा दावाही खर्गे यांनी केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article