महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस भाजपविरोधात आंदोलन करणार

06:39 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली

Advertisement

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहुल गांधींची बदनामी करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. ते जम्मू येथे काँग्रेसच्या प्रचारसभेत भाषण करीत होते. लवकरच काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार आहे, अशी घोषणा त्यांनी या सभेत केली. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसेच खासदार आणि आमदारही राहुल गांधींना धमक्या देत आहेत. राहुल गांधींची जीभ कापण्याची भाषा करीत आहेत. गांधी सत्य बोलत असूनही त्यांच्या विरोधात द्वेषपूर्ण वातावरणाची निर्मिती केली जात आहे. इंदिरा गांधी यांच्या विरोधातही अशीच वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा नेत्यांवर नियंत्रण ठेवत नाहीत. म्हणून काँग्रेस आता या नेत्यांच्या विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article